क्राईम

Suresh pujari arrested : उल्लासनगरच्या अंडरवर्ल्ड डॉनला फिलीपीन्समध्ये अटक, पैशे कमवण्यासाठी वापरायचा नामी शक्कल…

मुंबईमधून फरार झालेला अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारी याला फिलिपिन्समध्ये अटक केल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेने दिली आहे.

Suresh pujari arrested : मुंबईमधून फरार झालेला अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारी याला फिलिपिन्समध्ये अटक केल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेने दिली आहे. मुंबई पोलीस, सीबीआ आणि एफबीआय (Federal Bureau of Investigation) यांच्यामार्फत गेल्या काही दिवसांपासून ही कारवाई सुरु होती.

सुरेश पुजारीच्या संदर्भात भारत सरकार आणि फिलीपिन्स यांच्यात वेळोवेळी संपर्क होत असे. त्यानुसार माहिती मिळताच सुरेश पुजारीला अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुजारीवर नजर ठेवण्यात येत होती, अखेर एका इमारतीबाहेर उभे असताना त्याला 15 ऑक्टोबर रोजी ताब्यात घेण्यात आलं आहे.

सुरेश पुजारी हा काही वर्षांपूर्वी डॉन रवी पुजारीचा राईट हँड माणला जात असते, मात्र काही कारणांमुळे तो रवी पुजारीपासून वेगळा झाला आणि स्वत:ची टोळी निर्माण केली. सुरेश पुजारीची पैसा वसूल करण्याची टेक्निक काही वेगळी असायची, त्यामुळे तो मुंबईसह नवी मुंबई आणि ठाणे परिसरात जास्त चर्चेत असायचा,

सुरेश पुजारी हा मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील डान्सबार मालकांना पैशांसाठी ठराविक वेळेनुसार कॉल करत असे. जे लोक पैसे द्यायला नकार देतील, त्यांच्या शॉपवर, हॉटेलवर किंवा डान्सबारवर याचे लोक अंदाधूद गोळीबार करत असत. 2018 मध्ये, सुरेश पुजारीच्या टोळीतील लोकांनी कल्याण-भिवंडी महामार्गावरील के. एन. पार्क हॉटेलला टार्गेट केलं होतं, तिथे गोळीबार घडवून आणला होता. या गोळीबारमध्ये एका रिसेप्शनलाही गोळी लागली होती.

कसा लागला पुजारीचा सुगावा?

के. एन. पार्क हॉटेलवर झालेल्या गोळीबारानंतर सुरेश पुजारी आणि त्याचे कार्यकर्ते पोलिसांच्या नजरेस आले. मुंबई गुन्हे शाखेचे निरीक्षक अजय सावंत आणि सचिन कदम यांनी या केसवर स्पेशल टीम तयार केली, त्यानंतर सुरेश पुजारीच्या अनेक कार्यकर्त्यांची धरपकड सुरु झाली. सुरुवातीच्या काळात 6 जण पोलिसांच्या अटकेत होते, मात्र हळू हळू सुगावा काढत टोळीतील अतर लोकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. अशीच माहिती काढत पोलिसांना सुरेश पुजारी फिलीपिन्समध्ये असल्याचा सुगावा लागला.

सुरेश पुजारी 21 सप्टेंबरपासून फिलिपिन्समध्ये असल्याची माहिती मुंबई पोलिसांना समजली होती. त्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत इंटरपोलला ही माहिती देण्यात आली होती. सुरेश पुजारीशी संबंधित माहिती इंटरपोलशी शेअर केली गेली. त्यात तो पकडला गेला.

2007 मध्ये भारताबाहेर पलायन

सुरेश पुजारी मूळचा उल्लासनगरचा आहे. 2007 साली तो भारतातून पळून गेल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. परदेशांमध्ये फिरताना किंवा आंतराष्ट्र्रीय प्रवास करताना सुरेश पुरी आणि सतीश पै अशा नावांचा वापर करतो. या नावांनी त्याच्याकडे बनावट पासपोर्टही मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments