फेमस

Vasai Fort : भेट द्या वसई किल्ल्याला,पहा तिथे नेमकं पाहण्यासारखं काय आहे?

भारत सरकारने या किल्ल्याला 26 मे 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.

Vasai Fort :मुंबईत अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत त्यापैकीच एक वास्तू ही मुंबईच्या पालघर जवळील वसईचा किल्ला. वसई किल्ल्याला बसीन किल्ला (Bassein Fort) देखील म्हणतात. हा किल्ला पालघर जिल्ह्यातील वसई गावाजवळ आहे. हा एक भुईकोट किल्ला असून तो समुद्रकिनाऱ्यालगत बांधलेला आहे.(Visit Vasai fort, see what is there to see?)

भारत सरकारने या किल्ल्याला 26 मे 1909 रोजी
महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.वसई हा किल्ला पालघर शहरापासून 40 ते 45 km अंतरावर आहे. या किल्ल्यामध्ये आपल्यला आत गेल्यानंतर चर्च, न्यायालय व हॉस्पिटल इमारती दिसतात. किल्ल्याचे पूर्वीचे इतर अवशेष देखील येथे पाहायला मिळेल.

हा किल्ल्याच्या तीन बाजूंनी समुद्र व दलदलीने वेढलेला आहे ,तर एका बाजूने वसई गावाकडे उघडणारा रस्ता आहे. तसेच या किल्ल्याला दोन प्रमुख प्रवेशद्वारे असून एक गावाकडे व दुसरे बंदराच्या दिशेने आहे. किल्ल्याच्या चारही बाजूंनी पूर्वी तट होते व तटांची उंची ३० फुटांच्या वर होती.

किल्ल्याचा इतिहास

फोर्ट बेसिन किल्ल्याचे काम 1530 च्या सुमारास सुरू झाले. गुजरातचे सुलतान बहादूर शाह यांनी त्या काळात या भागावर राज्य केले. परंतु नंतर तो 1534 मध्ये पोर्तुगीजांच्या हाती गेला. पोर्तुगीज गव्हर्नर – नुनो दा कुन्हा, नंतर किल्ले शहर बांधण्यास सुरुवात केली. त्यामुळे वसई किल्ल्याला आणखी तटबंदी झाली.

पुढे, पेशवा बाजीरावांचा भाऊ चिमाजी आप्पा व त्याच्या मराठा सैन्याने 18 व्या शतकात वसई किल्ल्याचा ताबा घेतला. पण हा नियम अल्पायुषी होता. इंग्रजांनी हल्ला केला आणि लगेचच मराठ्यांकडून किल्ला जिंकला.

किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे

चर्च, न्यायालय, हॉस्पिटल, विहिरी, बुरुज, शिव मंदिर, हनुमान मंदिर, भुयारी मार्ग, नरवीर चिमाजी अप्पा स्मारक, वज्रेश्वरी देवी मंदिर, जोसेफ कॅथेड्रल आणि मुख्य किल्ला इत्यादी अनेक गोष्टी पर्यटकांना किल्ल्यात पाहायला मिळतील.

वसई किल्ल्यात प्रवेश शुल्क आकारले जात नाही. हा किल्ला वर्षभर पर्यटकांसाठी खुला असतो. तुम्ही दिवसभरात कधीही या किल्ल्याला भेट देऊ शकता.हा किल्ला सकाळी 6 वाजता उघडला जातो,तर सायंकाळी 6 वाजता बंद केला जातो.(फोर्ट बेसिन) वसई किल्ला  हा किल्ला रोड, पोलीस कॉलनी, वसई पश्चिम, वसई,मुंबई येथे स्थित आहे.

 

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments