घटना

व्हिडिओ : विमानतळावर लोकलसारखी गर्दी, काहींच्या फ्लाईट्स चुकल्या, पाहा नेमकं काय झालं… | Mumbai Airport

सकाळी मुंबई विमानतळ T - 2 वर सणासुदीमुळे मोठी गर्दी पाहायला मिळाली, गर्दीमुळे अनेक प्रवाशांची गैरसोय झाल्याचंही दिसून आलं.

Mumbai Airport | आज (शुक्रवार, दिनांक 8 ऑक्टोबर रोजी) सकाळी मुंबई विमानतळ T – 2 वर सणासुदीमुळे मोठी गर्दी पाहायला मिळाली, गर्दीमुळे अनेक प्रवाशांची गैरसोय झाल्याचंही दिसून आलं. अनेकांची उड्डाणे चुकली. त्यापैकी अनेकांनी ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून संताप व्यक्त केलेला दिसून येत आहे. आता तिथून अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. (Video: Crowds like locals at the airport, some missed flights, see exactly what happened)

दरम्यान, विमानतळाच्या (CSMIA – Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) प्रवक्त्यांनी याबद्दल सविस्त माहिती दिली आहे. सणासुदीमुळे विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे विमानतळाच्या टर्मिनस – २ वर ही गर्दी पाहायला मिळत आहे. देशातील इतर विमानतळांवरही अशीच परिस्थिती असल्याचं प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण विमानतळावर सुरक्षा वाढवली असल्याचंही प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे.

सीएसएमआयएने दिलेल्या निवेदनानुसार शासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे सर्वप्रकारे विमानतळावर पालन केले जात आहे, सर्व प्रोटोकॉलचे पालन होत आहे. विमानतळावर झालेल्या प्रवाशांच्या गौरसोईबद्दल विमानतळ व्यवस्थापनाने दिलगिरी व्यक्त केली आहे तर सर्व प्रवाशांना सर्वोत्तोपरी मदत केली जाईल, असे आवाहनही व्यवस्थापनाकडून केलं आहे.

वाढत्या प्रवाशांच्या संख्येमुळे ‘सीएसएमआयए’वरील टर्मिनल 1, 20 ऑक्टोबर 2021 पासून सुरु केले जाईल, अशी माहितीही विमानतळ व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments