आपलं शहरखूप काही

Water Supply Disrupted : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी,पाईपलाईन दुरुस्तीमुळे या दिवशी राहणार पाणी पुरवठा बंद…

26 ऑक्टोबर रोजी मुंबई शहरातील काही भागांमध्ये पाणी पुरवठा खंडित केला जाणार आहे.

Water Supply Disrupted : मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी, 26 ऑक्टोबर रोजी मुंबई शहरातील काही भागांमध्ये पाणी पुरवठा खंडित केला जाणार आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भांडुप संकुलमधील 1910 दशलक्ष लिटरच्या पंपिंग स्टेशनमध्ये BMC 1200 मिमी व्यासाचे दोन व्हॉल्व्ह बदलवण्यात येणार आहेत. म्हणून काही काळासाठी पाणी पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.(Important news for Mumbaikars, water supply will be cut off on this day due to pipeline repairs …)

26 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत हे काम केल जाणार आहे. त्यामुळे मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरे वगळता शहरातील सर्वच भागात पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. तसेच 15 टक्के पाणी कापल्याने कमी दाबाने पाणी सोडण्यात येणार आहे.

याशिवाय पवईमध्येही 1800 मिमी व्यासाच्या पाईपचे कामही करण्यात येणार आहे कारण तानसा तलावातून येणाऱ्या पाईपमध्ये गळतीहोत असल्याने त्या पाईपचे ही काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे के.पूर्व विभागतील काही भागात पाणी पुरवठा होणार नाही.

तर एस वॉर्ड, फिल्टरपाडा, जयभीम नगर, बेस्ट नगर, आरे मार्ग व परिसरात ही पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. एच.पूर्व वांद्रे टर्मिनल क्षेत्र व जी.उत्तर वॉर्ड, धारावी, धारावी मेन रोड, दिलीप कदम मार्ग, कुंभारवाडा, संत गोरकुंभार मार्ग परिसरातही पाणी पुरवठा करण्यात येणार नाही. BMC ने मुंबईकरांना आवश्यक पाणी जमा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments