आपलं शहरबीएमसी

Water supply disrupted : मुंबईत 3 दिवस काही भागात पाणीपुरवठा बंद; पहा BMC चा अल्टिमेटम

येत्या काही दिवसात मुंबईच्या काही भागांमध्ये पाणीपुरवठा खंडित राहणार आहे.

Water supply disrupted :  मुंबईकरांसाठी एक महत्वाची सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) दिली आहे.त्या सुचनेत BMC ने सांगितले आहे की मुंबईत पुढील 3 दिवस पाण्याच्या पुरवठ्यात कमतरता असणार आहे. येत्या काही दिवसात मुंबईच्या काही भागांमध्ये पाणीपुरवठा खंडित राहणार आहे.(Water supply cut off in some parts of Mumbai for 3 days; See BMC’s ultimatum)

5 आणि 6 ऑक्टोबर रोजी मुंबईतील परळ व नायगावमधील पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे. 5 ऑक्टोबर सकाळी 10 वाजेपासून ते 6 ऑक्टोबर सकाळी 10 वाजेपर्यंत परळ व नायगाव या दोन्ही ठिकाणी पाणी पुरवठा केला जाणार नाही.

अंधेरी आणि विलेपार्ले येथेही 6 ऑक्टोबर रोजी पाणीपुरवठा खंडित होणार आहे, 6 ऑक्टोबर सकाळी 10 वाजेपासून ते 7 ऑक्टोबर सकाळी 10 वाजेपर्यंत अंधेरी व विलेपार्ले या दोन्ही ठिकाणीही पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे.

BMC ने सांगितले की, BMC ने पाणी वाहतूकच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.यामुळे मुंबईच्या काही भागांमध्ये पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणार आहे. 5 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या काळात देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.त्यामुळे पुढील 3 दिवस पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. तसेच BMC ने या भागांमध्ये राहणाऱ्या लोकांना घरी आवश्यक पाणी ठेवावे असे आवाहन केले आहे.

 

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments