आपलं शहरखूप काही

Water taxi : नवी मुंबई ते मुंबई सुरू होणार वॉटर टॅक्सी सेवा, पहा कसं आहे स्ट्रक्चर

यामुळे नवी मुंबईकर 20 मिनिटांत मुंबईला,तर अलिबागला एका तासात पोहोचू शकतात.

Water taxi :  नवी मुंबईतील खाडीचा वापर राज्य सरकारने जलवाहतुकीसाठी करण्याचा निर्णय घेतला आहे.येत्या 6 महिन्यांत नवी मुंबई शिपिंग सेवा सुरू होणार आहे. यासाठी नवी मुंबईच्या खाडी जवळ एक भव्य जलमार्ग टर्मिनसची स्थापना करण्यात आली आहे. या जलवाहतुकीद्वारे अलिबाग, ठाणे,उरण आणि कोकण देखील मुंबईशी जोडले जाणार आहे.(Water taxi service will start from Navi Mumbai to Mumbai, see how the structure is)

तर, येत्या काही दिवसात येथे RORO सेवेची बोट आणून चाचणी करण्यात येणार आहे.तसेच सिडकोने नेरुळ खाडीवर 110 कोटी रुपये खर्च करून बोट टर्मिनल उभारले आहे. येथून RORO सेवा गेट वे ऑफ इंडिया, भाऊचा धक्का, मांडवा, अलिबाग, ठाणे, उरण, वसई विरार इत्यादी ठिकाणी सुरू केली जाणार आहे.यामुळे नवी मुंबईकर 20 मिनिटांत मुंबईला,तर अलिबागला एका तासात पोहोचू शकतात.

या बोटीमध्ये एका वेळी 300 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.तर 80 चारचाकी आणि 75 दुचाकी वाहने या बोटीतून नेता येणार आहेत.सध्या या बोट टर्मिनलचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे.बोटीवर जाण्यासाठी उरलेले फक्त फेंडर आणि शिडी बसवण्याचे काम राहिले आहे. हे काम 30 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होणार असून ही सेवा लवकर प्रवासासाठी उपलब्ध होणार आहे.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments