Aryan Khan in jail : तुरुंगात आर्यनची काय परिस्थिती, साथिदाराने सांगितला संपूर्ण प्रसंग

सध्या क्रुज शिप ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तुरुगांत आहे. मुंबईच्या आर्थर तुरुंगात त्याला सध्या ठेवण्यात आलं आहे, मात्र त्याची सध्याची तुरुंगातील परिस्थिती कशी आहे, याबाबतची माहिती अजूनही कोणाला नव्हती, मात्र एका वृत्तसंस्थेने आर्यनच्या सहकैद्यासोबत बातचित केली आहे. (What is the condition of Aryan Khan in jail, the companion told the whole incident)
श्रवण नाडर हा आर्थर तुरुंगामध्ये आर्यन खानचा सहकैदी होता, ते दोघे समोरासमोरच्या बॅरेटमध्ये होते, त्यामुळे तुरुंगामध्ये आर्यनची नेमकी परिस्थिती काय होती, त्याचे राहणीमान कसे होते, याबाबतची चर्चा एका वृत्तसंस्थेने श्रवण नाडरसोबत केली आहे.
आर्यन खानला इतर कैद्यांप्रमाणे तुरुंगात वागवलं जातं, कोणताही भेदभाव होत नाही, पहिल्या दिवशी आर्यन खान जेव्हा तुरुंगामध्ये आला होता, त्यावेळेस तो नाराज होता, काहीप्रमणात तो रडलादेखील होता, मात्र त्यानंतर त्याने काहीप्रमाणात पोलिसांना प्रतिसाद देण्यास सुरुवात केली होती.
सर्व कैद्यांना जे जेवण मिळत असे, तेच जेवण इतर कैद्यांनाही दिलं जात असे, जमिनीवर एका कंबलवर झोपणे असो किंवा सर्व कैद्यांसोबत राहणे असो, इतर सामान्य कैद्यांप्रमाणे आर्यन खानला वागणूक दिली जात असायची, असं मत सहकैदी श्रवण नाडर यांनी मांडलं आहे.
श्रवण नाडर हा सहा महिन्यांपुर्वी तुरुंगात गेला होता, मात्र आर्यन खान आल्यानंतर 4 दिवसांनंतर श्रवण नाडर याची सुटका झाली होती.
हेही वाचा :