
Winter season : हिवाळी अधिवेशन (शितसत्र)
महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन हे दरवर्षी आयोजित केले जाते. ज्यात त्यांची दोन्ही गृह म्हणजेच विधानसभा आणि विधान परिषद यांचा समावेश आहे. हिवाळी अधिवेशन हे दरवर्षी नागपूरमध्ये नोव्हेंबर-डिसेंबर-जानेवारीमध्ये आयोजित केली जातात. हा सत्र विधान भवन, नागपूर येथे आयोजित केला जातो. नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे. राज्याचा कारभार कसा चालू आहे याचा आढावा घेण्यासाठी हे शितसत्र आयोजित केले जाते.(The decision on where the winter session 2021 will take place is in Mumbai …)
यंदाचे हिवाळी अधिवेशन
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी नागपूर जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व तयारी करण्यात येत आहे. या तयारीचा आढावाही वरिष्ठ पातळीवर घेण्यात येत आहे.
मात्र, यावेळचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नसून, याबाबतचा अंतिम निर्णय मुंबईतच घेण्यात येणार आहे, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम व सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्ता भरे यांनी सांगितले.
हे ही वाचा :