आपलं शहरफेमस

Worli Sea Face : मुंबईतील वरळी सी फेस का करते पर्यटकांना आकर्षित, पहा का आहे खास…

मुंबई हे जरी धावपळीच शहर असलं तरी येथे निवांतपणे वेळ घालवण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत,जसे की मुंबईतील प्रसिद्ध वरळी सी फेस.

Worli Sea Face : मुंबई हे स्वप्नांचे शहर नक्कीच आहे,कारण हे स्वप्न दाखवते आणि ते पूर्णही करते. मुंबई हे जरी धावपळीच शहर असलं तरी येथे निवांतपणे वेळ घालवण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत,जसे की मुंबईतील प्रसिद्ध वरळी सी फेस. वरळी सीफेस हे मुंबईच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे जेथे पर्यटक नेहमी भेट देतात. तसेच मुंबईत मान्सूनचा अनुभव घेण्यासाठी हे सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे, कारण प्रचंड लाटा उंच भरतीच्या वेळी रस्त्याच्या कडेलावर येतात. तुम्ही जर कधी वरळी सी फेसला गेले नसाल,तर एकदा नक्की भेट द्या.(Why does Worli Sea Face in Mumbai attract tourists, see why it is special …)

वरळी सी फेसचा रस्ता सुमारे 3.5 मीटर लांबीचा आहे. त्याच्या उत्तर टोकाला वरळी सी फेस गार्डन देखील आहे. दक्षिणेकडे चालत असताना, तुम्हाला भगवान गौतम बुद्ध उद्यान व बीएमसी गार्डन अशी दोन सार्वजनिक उद्याने दिसतील. वरळी साप्ताहिक शेतकरी बाजार समुद्राच्या अगदी शेवटी आहे. वरळी सी फेसच्या उत्तर टोकाच्या दिशेने सुरू होणारे आयकॉनिक वांद्रे वरळी सीलिंकचे दृश्य देखील पाहायला मिळते.

बॉलिवूड चित्रपटांमध्ये वरळी सी फेस पाहायला मिळेल. येथे अनेक चित्रपटांच्या शूटिंग होत असतात. तसेच आपल्या कुटुंबासह, एकट्याने किंवा मित्रांसह बाहेर जाण्यासाठी हे सी फेस  हॉटस्पॉट आहे. हे ठिकाण आजही मुंबईतील सर्वात जास्त मागणी असलेल्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे. कारण येथे निवांतपणे वेळ घालवता येतो, उसळणाऱ्या लाटा, लखलखणारा सूर्य आणि विशाल आकाश हे सर्व पाहून व्यक्ती या दृश्यांमध्ये अगदी रमून जातो.

वरळी सी फेस दक्षिण मुंबईतील एक पॉश क्षेत्र आहे. हा एक व्यवसाय जिल्हा व एक प्रमुख निवासी क्षेत्र आहे, उत्तरेला वरळी किल्ल्यापासून ते दक्षिणेला नारायण पुजारी नगरपर्यंत विस्तारलेला हा परिसर शहरातील एक लोकप्रिय ठिकाण आहे. वरळी सी फेसमध्ये वरळी किल्ला, हाजी अली दर्गा व वांद्रे-वरळी सीलिंक (राजीव गांधी सी लिंक) अशी अनेक  महत्त्वपूर्ण प्रसिद्ध ठिकाणे येथे आहेत.  याशिवाय, येथे अनेक महागडे  रेस्टॉरंट्स व शॉपिंग आउटलेट देखील आहेत.

वरळी सी फेस मुंबईच्या वरळी येथे स्थित आहे. येथे कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. प्रचंड समुद्र, उंच-उंच इमारती आणि निळाभोर आकाश हे सर्व वरळी सी फेसला आणखी आकर्षक बनवते.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments