
26/11 Attack : 26 नोव्हेंबर 2008 ही तारीख मुंबईकर व देशातील इतर कोणीही आजवर विसरू शकले नाही. 26/11 हा दिवस मुंबईतीलच नव्हे, तर भारतातील काळा दिवस मानला जातो. 26/11 च्या दिवशी मुंबईवर अचानकपणे करण्यात आलेल्या हल्ल्याला जवळपास 13 वर्षे पूर्ण झाली आहेत.(The whole of Mumbai was blown up, why is the fire of 26/11 still burning today)
26/11 च्या त्या भयानक हल्ल्याची भीती आजही नागरिकांच्या मनात कायम आहे. कारण हा दिवस मुंबईकर व त्या हल्ल्यामध्ये अडकलेले नागरिक अजूनदेखील विसरलेले नाहीत. हे दिवस जरी आठवले तरीसुद्धा मुंबईकरांच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत.
26 नोव्हेंबर 2008 रोजी, लष्कर-ए-तैयबाच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील ताज हॉटेलसहीत सहा ठिकाणी बॉम्बस्फोट व गोळीबार करून मुंबईत धुमाकूळ घातला होता. या हल्ल्यात 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता आणि 300 हून अधिक जण जखमी झाले होते. सर्वाधिक मृत्यू हे छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे झालेल्या हल्ल्यात झाले. तर ताजमध्ये दहशतवाद्यांनी 31 जणांचे प्राण घेतले.
मुंबई हल्ल्याची आठवण झाली की आजही लोकांची मने धडधडतात. जवळजवळ 60 तास दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरु होती. 29 नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत नऊ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता आणि अजमल कसाबच्या रूपाने एक दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात होता.च्या ताब्यात होता.
हल्ला झाला तेव्हा अनेकजण प्रतिक्रिया देत होते आणि याच प्रतिक्रियेचे अनेक पडसाद देखील उमटत होते. 26 नोव्हेंबर रोजी 10 दाहशवाद्यांनी अक्षरशः संपूर्ण मुंबईकरांची झोप उडवली होती. यासह हल्ल्याचे अनेक परिणामदेखील देशासह मुंबईला भोगावे लागले.
26/11 च्या या घटनेमुळे बहुतांश शाळा, महाविद्यालये, कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मुंबई शेरबाजार व राष्ट्रीय शेरबाजार 27 नोव्हेंबर रोजी बंद ठेवण्यात आले होते. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण थांबवण्यात आले, काही आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी आपली मुंबईची उड्डाणे देखील रद्द केली. तर मुंबईतील क्रिकेट सामने देखील पुढे ढकलण्यात आले होते. 26/11 चा हा भयानक हल्ला मुंबईकर आज देखील विसरू शकले नाहीत.
हे ही वाचा :