खूप काही

AAHAR News : म्हणून वाढणार हॉटेल्स व रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांच्याच्या किंमती…

आता नागरिकांना रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आस्वाद घेणेही महाग होणार आहे. 

AAHAR News : कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे सर्व बंद असल्याने आधीच महागाई खूप वाढली आहे. आता कुठे सर्व सुरळीत होत असताना,पुन्हा सर्व वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. अशातच आता नागरिकांना रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आस्वाद घेणेही महाग होणार आहे.  रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (AAHAR) ने राज्यातील रेस्टॉरंटमधील सर्व खाद्यपदार्थांच्या किमती 30 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.(So food prices in hotels and restaurants will go up …)

रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी ग्राहकांना आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत.  पेट्रोल, डिझेल आणि खाद्यतेलाच्या किमतीही गेल्या काही दिवसांत खूप वाढल्या आहेत.  भाजीपाल्याची आवक कमी असल्याने त्यांचे भावही गगनाला भिडले आहेत.  त्याचवेळी कांद्याचे भाव अद्याप कमी झालेले  नाहीत.

त्यामुळे रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांवरही या सगळ्याचा परिणाम होत आहे.  वाढती महागाई आणि लॉकडाऊनमुळे रेस्टॉरंटना आधीच मोठ्याप्रमाणात तोटा सहन करावा लागला  आहे. त्यामुळे रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशनने खाद्यपदार्थांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments