खूप काहीटेक

AC Electric Bus : मुंबई विमानतळावरून ‘बेस्ट’ सर्व्हिस, ठाणे, वाशी आणि सगळीकडे

बृहन्मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) ने दोन नवीन एसी इलेक्ट्रिक बस मार्गांची घोषणा केली आहे.

AC Electric Bus : मुंबईतील विमानतळावरून बसेसने प्रवास करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. बृहन्मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) ने दोन नवीन एसी इलेक्ट्रिक बस मार्गांची घोषणा केली आहे. ही बस सेवा छत्रपती शिवाजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (T2) ते ठाणे व दुसरा CSMT ते भाऊचा धक्का, ज्याला माजगाव डॉक असेही म्हणतात. अशा दोन मार्गांसाठी सुरू करण्यात येणार आहेत.(‘Best’ service from Mumbai Airport, Thane, Vashi and everywhere)

या सेवा 1 नोव्हेंबर 2021 पासून सुरू

 माहितीनुसार,  छत्रपती शिवाजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ठाणे मार्गावर किमान भाडे 50 रुपये, तर कमाल भाडे 125 रुपये असेल. तसेच विमानतळावरून वाशी मार्गावर देखील सहा सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.

या दोन्ही इलेक्ट्रिक बसेस दोन्ही मार्गावरील प्रवाशांची मागणी पूर्ण करतील.  याशिवाय परिवहन मंडळाने 1 नोव्हेंबरपासून विमानतळ ते बोरिवली व वाशी येथे एसी इलेक्ट्रिक बसेस पुन्हा सुरू केल्या आहेत.  या बसेस अनुक्रमे बोरिवली आणि वाशीपर्यंत धावणार आहेत.

विमानतळापासून बोरिवली मार्गावर किमान भाडे 50 रुपये, तर  कमाल भाडे 100 रुपये असणार आहे. तसेच वाशी मार्गासाठी 150 रुपये शुल्क आकारले जाईल.

याशिवाय, विमानतळ ते दक्षिण मुंबई व वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) पर्यंत दोन समर्पित बस मार्ग नुकतेच सुरू करण्यात आले आहेत.  यामुळे उबेर व ओला सारख्या एग्रीगेटर कॅबला कठीण स्पर्धा मिळेल असे तज्ज्ञांनी सांगितले.

या दोन इलेक्ट्रिक बसेस नंतर अधिकाधिक इलेक्ट्रिक बसेस ताफ्यात समाविष्ट करण्याचा अधिकारी विचार करत आहेत.  मार्च 2023 पर्यंत, बेस्टचे 50 टक्के इलेक्ट्रिक बस फ्लीटचे उद्दिष्ट आहे. तर  मार्च 2027 पर्यंत ताफ्यातील सर्व बस इलेक्ट्रिक असणार आहेत,असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments