फेमस

Babasaheb Purandaren : राज ठाकरे व बाबासाहेब पुरंदरे यांच्यात अत्यंत जवळचे नाते का? का दिली होती त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना साथ…

बाबासाहेब पुरंदरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात अत्यंत जवळचे नाते का व कसे निर्माण झाले.

Babasaheb Purandaren : महाराष्ट्राचे लाडके व एक अत्यंत उत्तम शिवशाहीर म्हणजे बाबासाहेब पुरंदरे. आपणास माहीत आहे का? बाबासाहेब पुरंदरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात अत्यंत जवळचे नाते का व कसे निर्माण झाले. तसे पाहिले तर राज ठाकरे हे बाबासाहेब पुरंदरे यांना आपली जवळची व्यक्ती मानतात व राज ठाकरे यांची बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर नितांत श्रद्धा आहे. जेव्हा कधीही बाबासाहेब पुरंदरे हे राज ठाकरे यांची आठवण काढतात, तेव्हा  राज ठाकरे क्षणभरही उशीर न करता त्यांना भेटायला थेट पुण्याला जायचे.(Why a very close relationship between Raj Thackeray and Babasaheb Purandare?  Why did he support Babasaheb Purandare …)

राज ठाकरे यांना कधी कामानिमित्त पुण्याला जायचे असेल, तर ते पुण्यात गेल्यानंतर सर्वप्रथम बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घ्यायचे. राज ठाकरे बाबासाहेबांना इतके मनापासून प्रेम करतात की जेव्हा बाबाहेबांच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराला महाराष्ट्रातून विरोध करण्यात येत होता, तेव्हा राज ठाकरे यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता.

2015 मध्ये  बाबासाहेब पुरंदरे यांना तत्कालीन फडणवीस सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे जाहीर केले होते, तेव्हा त्यांना हा पुरस्कार प्रदान करू नये, म्हणून राष्ट्रावादी काँग्रेसकडून प्रचंड विरोध करण्यात येत होता. काही गटांनी त्यांच्या या पुरस्कार सोहळ्याला विरोध करत उधळून टाकण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी त्या गटांचा अत्यंत आक्रमकपणे निषेध करत त्यांना आपल्या मनसे स्टाइलने इशारा दिला होता.

‘जर बाबासाहेब पुरंदरे यांना हात जरी लागला तरी याद राखा मी महाराष्ट्रात तांडव करेन’, अशा आक्रमक शब्दात राज ठाकरे यांनी त्या गटांना इशारा दिला होता.

त्यावेळी राज ठाकरेंनी आपल्या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसवर साधला निशाणा

बाबासाहेबांच्या या पुरस्कार सोहळ्याला उधळून टाकण्याची  धमकी दिली होती, तेव्हा राज ठाकरे यांनी बाबासाहेबांच्या बाजूने ठामपणे उभे राहून, विरोधकांना मनसे स्टाइलने इशारा दिला होता.

बाबासाहेब पुरंदरेंना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार न देण्यास विरोध करण्यामागे शरद पवार व भाजपमधील काही मंत्री आहेत, जे अत्यंत घाणेरडे राजकारण करत आहे. असा आरोप राज ठाकरेंनी केला होता.

शरद पवारांनीच जितेंद्र आव्हाड यांना फूस लावलेली आहे. त्यांच्या या राजकारणामुळेच जितेंद्र आव्हाड यांची बाबासाहेब पुरंदरेंबाबत बोलण्याची एवढी हिम्मत झाली. असे म्हणत राज ठाकरे यांनी सांगितले की,  माझ्या आजोबांच्या पुस्तकातील दाखलेही आव्हाडांनी देऊ नयेत.

राज ठाकरे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे, त्यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांच्या समर्थनार्थ व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात मनसे रस्त्यावर  उतरली होती. त्यावेळी मनसैनिकांकडून शरद पवारांचे पुतळे देखील जाळण्यात आले होते.

जेव्हा बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला होता,तेव्हा पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांनी बाबासाहेबांचे अभिनंदन केले होते तसेच अजित पवार यांनीही आपण बाबासाहेबांचे आदर करतो असे सांगितले होते. मग  अशावेळी अचानक हा घुमजाव का करण्यात आला?’, असा सवाल विचारत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला होता.

केवळ एखाद्या वाक्यासाठी जे शिवचरित्र लिहण्यात आले आहे. त्यावर आक्षेप घेणे काही बरोबर नाही. जे आक्षेप आहेत त्यावर खुली चर्चा केली जाऊ शकते. त्यासाठी राजकारण करण्याची गरज नाही. असेही राज ठाकरे यांनी त्यावेळी सांगितले होते.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments