खूप काही

Balasaheb Thackeray : बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी, पहा का ओळखले जात होते हिंदुसम्राट

शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची आज 9 वी पुण्यतिथी आहे.

Balasaheb Thackeray : संपूर्ण देशात हिंदुत्ववादी नेता म्हणून ओळख असलेले शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची आज 9 वी पुण्यतिथी आहे. 17 नोव्हेंबर 2012 मध्ये म्हणजेच आजच्या दिवशी त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता.(Balasaheb Thackeray Punyatithi, see why he was known as Hindu Emperor)

बाळ ठाकरे हे महाराष्ट्रातील हिंदुत्वाचा सर्वात मोठा चेहरा होता.  कट्टर हिंदू नेता अशी त्यांची प्रतिमा कायम राहिली. ते नेहमीच म्हणायचे मुंबई ही मराठी माणसाची आहे. महाराष्ट्र राज्य हे हिंदूंचे राज्य आहे.  त्यांनी बाहेर राज्यातून येणाऱ्यांना कायम विरोध केला. सुमारे 4 दशके महाराष्ट्राचे राजकारण त्यांच्या इशार्‍याभोवती फिरत होते.  ते नेहमी चांदीच्या सिंहासनावर बसायचे आणि स्वतःच्या अटींवर जगायचे.

1966 मध्ये शिवसेना पक्ष स्थापन केला व 1989 मध्ये ‘सामना’ वृत्तपत्र सुरू केले

बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी केशव सीताराम ठाकरे यांच्या घरी झाला.  वडिलांच्या विचारसरणीचा त्यांच्यावर प्रभाव होता.  बाळासाहेब ठाकरे यांनी पत्रकार व व्यंगचित्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.  ‘द फ्री प्रेस जर्नल’मधून करिअरला सुरुवात केल्यानंतर ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्येही त्यांची व्यंगचित्रे येत होती.  1960 मध्ये त्यांनी ही नोकरी सोडली व ‘मार्मिक’ नावाने स्वतःचे राजकीय मासिक त्यांनी सुरू केले होते. तसेच 1966 मध्ये त्यांनी शिवसेना या राजकीय पक्षाची स्थापना केली. तर त्यांची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी 1989 मध्ये ‘सामना’ हे वृत्तपत्र सुरू केले.

त्यांची प्रतिमा कट्टर हिंदुत्ववादी

बाळासाहेब ठाकरे हे नेहमी महाराष्ट्रचे वर्णन हिंदू राज्य असे करायचे.  त्यांची प्रतिमा कट्टर हिंदू नेता अशी राहिली आणि कदाचित त्यामुळेच त्यांना हिंदू सम्राटही म्हटले जायचे.  ते व्हॅलेंटाइन डेला हिंदू धर्म व संस्कृतीला धोका मानत होते.

सरकारमध्ये नसतानाही ते सर्व निर्णय घेत असत.

1995 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती पहिल्यांदा सत्तेवर आली.  सरकारमध्ये नसताना त्यांनी सर्व निर्णयांवर प्रभाव टाकला. त्यांना महाराष्ट्राचे किंग मेकर म्हणून ओळखले जात होते.  सध्या काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत शिवसेना सत्तेत आहे.  त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत.

निवडणूक लढवण्यास आणि मतदान करण्यावर बंदी होती.

द्वेष व भीतीच्या राजकारणामुळे निवडणूक आयोगाने बाळासाहेब ठाकरे यांना निवडणूक लढवण्यास आणि मतदान करण्यास बंदी घातली होती.  त्यांना 28 जुलै 1999 रोजी निवडणूक आयोगाने 6 वर्षांसाठी निवडणुक लढवण्यावर बंदी घातली होती.  बंदी उठवल्यानंतर 2005 मध्ये त्यांना मतदान करता आले.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments