आपलं शहरबीएमसी

BMC Election 2022 : मुंबई भाजप उत्तर भारतीय मोर्च्याद्वारे BMC च्या 227 प्रभागांमध्ये चौपालांचे आयोजन…

मुंबई उत्तर भारतीय आघाडीचे अध्यक्ष जे.  पी. सिंह यांच्या नेतृत्वाखाली रविवारी मुंबई महापालिकेच्या सर्व 227 प्रभागांमध्ये चौपालांचे आयोजन करण्यात आले होते.

BMC Election 2022 : मुंबईत सध्या BMC निवडणूक 2022 साठी सर्व पक्ष हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. माजी मुख्यमंत्री,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई भाजपचे उपाध्यक्ष व चौपाल प्रभारी आचार्य पवन त्रिपाठी तसेच मुंबई उत्तर भारतीय आघाडीचे अध्यक्ष जे.  पी. सिंह यांच्या नेतृत्वाखाली रविवारी मुंबई महापालिकेच्या सर्व 227 प्रभागांमध्ये चौपालांचे आयोजन करण्यात आले होते.(Mumbai BJP North Indian Morcha organizes chaupals in 227 wards of BMC …)

ज्यामध्ये मुंबई भाजपच्या (BJP uttar bhartiya) सर्व बड्या नेत्यांसह खासदार, आमदार व नगरसेवकांनी उत्तर भारतीय जनतेशी थेट संवाद साधला.

त्यात भाजपचे खासदारही झाले सामील

उत्तर मुंबईतील खासदार मनोज कोटक, उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी रविवारी या आयोजित चौपालमध्ये हजेरी लावली.  तर दक्षिण मुंबई-मलबार हिलमध्ये मुंबई भाजपचे अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा, वांद्रेत आमदार आशिष शेलार, गोरेगावमध्ये आमदार विद्या ठाकूर, चेंबूरमध्ये मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय आणि दिंडोशीमध्ये माजी आमदार व मुंबई भाजपचे उपाध्यक्ष राजहन सिंह या सर्व नेत्यांनी चौपालमध्ये हजेरी लावून जनतेला संबोधित केले.

उत्तर भारतीय मतदारांची नजर

मुंबई भाजपचे उपाध्यक्ष व चौपाल प्रभारी आचार्य पवन त्रिपाठी म्हणाले की, आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या सर्व 227 प्रभागांमध्ये हिंदी भाषिकांसाठी 500 हून अधिक चौपालांचे आयोजन करण्यात आले आहे.  पुढील काळात आणखी चौपालांचे आयोजन करण्यात येणार आहे.  याद्वारे सर्व हिंदी भाषिक उत्तर भारतीयांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

मुंबई महानगरपालिकेशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या कोणाला असेल, तर ते मुंबई भाजपा उत्तर भारतीय मोर्चाने आयोजित केलेल्या चौपालमध्ये येऊन बिनदिक्कत आपल्या समस्या सोडवू शकतात.  या चौपालांच्या माध्यमातून मुंबईतील उत्तर भारतीयांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी चर्चा करण्यात आली.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments