खूप काहीहेल्थ

BMC Health Department : BMC घरोघरी जाऊन करेल टीबी रुग्णांची तपासणी, ही मोहीम सुरू, काय असतील फायदे…

मुंबईतील टीबी नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी BMC चा आरोग्य विभाग आता घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी करणार आहे.

BMC Health Department : मुंबईत कोरोना व  इतर आजार ही मोठ्या प्रमाणात आहेत. या आजारांपैकी एक म्हणजे मुंबईत टीबीचे रुग्णांमध्येही वाढ होत आहेत. त्यामुळे या आजारावर  मुंबईतील टीबी नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी BMC चा आरोग्य विभाग आता घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी करणार आहे.(BMC will conduct door-to-door screening of TB patients, launch this campaign, what will be the benefits …)

मुंबईत 24 टीबी जिल्हे आहेत. ज्यात 54 युनिट्स करण्यात आली आहेत.  ही सर्व युनिट घरोघरी जाऊन लोकांची तपासणी करणार आहेत.  15 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीत ही तपासणी सुरू होणार आहे.  या तपासणी मोहिमेत BMC सुमारे 17 लाख रुग्णांपर्यंत पोहोचून त्यांची चौकशी करणार आहे. हे सर्वेक्षण सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत होणार असून, BMC च्या आरोग्य अधिकारी मंगला गोमरे यांनी  टीबी तपास पथकाला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

मंगला गोमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, BMC ने या वर्षात प्रथमच 15 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2021 या कालावधीत ‘स्पेशल ऍक्टिव्ह केस फाईंडिंग’ लागू केले आहे.  या मोहिमेअंतर्गत 54 टीबी युनिट क्षेत्रातील सुमारे 17 लाख लोकांची टीबी तपासणी करण्यात येणार आहे.

BMC च्या 876 टीम करणार काम

या तपासणी मोहिमेसाठी BMC ची 876 टीम काम करणार आहेत.  क्षयरोगाची तपासणी करण्यासाठी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत ही टीम त्यांच्या कामाच्या ठिकाणी घरोघरी जाऊन तपासणी करेल.  जर घरातील व्यक्ती कामासाठी किंवा इतर कारणास्तव बाहेर असेल तर, टीम दिवसाच्या इतर वेळी देखील त्यांना भेट देऊन तपासणी करेल.

मोफत वैद्यकीय सुविधा दिली जाईल

प्राथमिक तपासणीत आढळून आलेल्या संशयित रुग्णांची एक्स-रे तपासणी करण्यात येणार आहे.  ही चाचणी रुग्णाच्या घराजवळील सरकारी किंवा BMC प्रयोगशाळेत केली जाणार आहे.  संशयित रुग्णाला एक्स-रे तपासणीसाठी खास ‘व्हाऊचर’ दिले जातील.  त्यामुळे संशयित रुग्णांना नियुक्त केलेल्या खासगी क्ष-किरण केंद्रात मोफत तपासणी करून घेण्याची सुविधा मिळणार आहे.  मोहिमेदरम्यान क्षयरोगग्रस्त रुग्णांना मोफत वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments