आपलं शहरबीएमसी

BMCtweets : हॅलोविननिमित्त BMC ने शेअर केला एक मजेदार व्हिडीओ; पहा काय आहे त्यामागचे कारण…

हॅलोविनच्या निमित्ताने केवळ लोकच नाही तर BMC देखील जल्लोषाच्या वातावरणात दिसत आहे.

BMCtweets : 31ऑक्टोबर हा दिवस परदेशात हॅलोविनचा सण साजरा केला जातो.  यासणानिमित्ताने  ते लोक भूतांचे कपडे व त्याप्रमाणे आपला गेटअप करत असतात. भारतातही हॅलोविनची क्रेझ हळूहळू वाढत आहे.(BMC shared a funny video for Halloween;  See what is the reason behind it …)

हॅलोविनच्या निमित्ताने केवळ लोकच नाही तर BMC देखील जल्लोषाच्या वातावरणात दिसत आहे.  नुकतेच मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत हँडलवरून एक विशेष ट्विट करण्यात आले आहे, ज्याद्वारे ते हॅलोविन साजरे करत आहेत. तसेच एक विशेष संदेश BMC  त्याद्वारे लोकांपर्यंत पोहोचवताना दिसते.

बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच BMC ने काळ आपल्या ट्विटरवर एका सांगाड्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्या व्हिडीओद्वारे हॅलोविनच्या शुभेच्छा देताना BMC ने व्हिडीओमध्ये प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यासाठी लोकांना जागरूक करणारा संदेश दिला आहे.

व्हिडिओमध्ये दिसणारा सांगाडा प्लास्टिकचा आहे.  त्याचे शरीर वाकलेल्या बाटली व प्लास्टिकच्या काचेचे बनलेले असून  तो खूपच मजेदार फिरत असल्याचे दिसते.  व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, प्लास्टिक हे आपल्या प्रिय पृथ्वीला घाबरवण्यासाठी आहे. ते वापरणे टाळा. BMC च्या या व्हिडिओवर अनेक जण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.  BMC ची ही शैली अनेकांना खूप आवडली आहे.  त्याचबरोबर अनेक लोक BMC वर टीकाही करताना दिसत आहेत.  मुंबईत प्लास्टिक बंदीसाठी बीएमसीने कठोर पावले उचलली नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे.

 

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments