आपलं शहरलोकल

Central Railway : आमदारांचा रेल्वे स्थानकांवर दौरा, अनेक सुविधा मिळणार?

घाटकोपर स्थानकाच्या पूर्वेचा आढावा घेतला व तिकीट खिडकीजवळील फूट ओव्हर ब्रिजचे भूमिपूजन करण्यात आले.

Central Railway : भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह त्यांच्या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या रेल्वे स्थानकाचा तसेच घाटकोपर स्थानकाच्या पूर्वेचा आढावा घेतला व तिकीट खिडकीजवळील फूट ओव्हर ब्रिजचे भूमिपूजन करण्यात आले.(MLAs visit railway stations, will get many facilities?)

घाटकोपर स्थानक मेट्रोला जोडल्यानंतर मेट्रोच्या प्रवाशांना थांबण्यासाठी जागाच उरली नाही. अशा परिस्थितीत हा FOB मेट्रोच्या प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे गर्दीही कमी होईल तसेच रेल्वे व मेट्रो ट्रेनमध्ये कनेक्टिव्हिटी म्हणून काम करेल, प्रवासी येथे थांबू शकतील, यामुळे खासदार मनोज कोटक यांच्या अथक परिश्रमाने रेल्वे व मेट्रो दरम्यान या FOB चे भूमिपूजन सुद्धा झाले.

या FOB ला होल्डिंग डेक म्हणतात.  पुढील काळात असे तीन FOB बनवून त्यात जोडण्यात येणार असून, त्यामुळे घाटकोपर ते अंधेरी व अंधेरी ते घाटकोपर या दिशेने मेट्रोने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना त्याचा थेट फायदा होणार आहे. पुढील काळात एमआरव्हीसी अंतर्गत दोन FOB चे कामही सुरू होणार आहे.

त्याचबरोबर मनोज कोटक यांनी मुलुंड स्थानकालाही भेट दिली,तर मुलुंड पूर्वेकडे एस्केलेटर व लिफ्ट बसवण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली असून, त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांसह वृद्ध, गरोदर महिलांनाही फलाटावर पोहोचता येईल. फारसा त्रास होणार नाही, त्याच बरोबर या निमित्ताने प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर बांधलेली नवीन लिफ्ट प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली.

स्थानकावर जास्त गर्दी होऊ नये याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

तसेच मनोज कोटक यांनी मानखुर्द येथील रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत घटनास्थळी भेट दिली, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी BMC, PWD रेल्वेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठकही घेतली.  यावेळी खासदार मनोज कोटक म्हणाले की, मला आनंद आहे की येत्या काळात लाखो प्रवाशांना घाटकोपरच्या FOB चा थेट लाभ मिळणार आहे.  त्यामुळे घाटकोपर आणि मेट्रो स्थानकांवरील गर्दीही कमी होणार असून, कोरोनाच्या काळात स्थानकावर अधिक गर्दी होणार नाही, याकडे आम्ही विशेष लक्ष देत आहेत.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments