आपलं शहरलोकल

Central Railway : रेल्वेने पूर्ण केली 70 वर्ष, 1951 पासून आहे लोकांच्या सेवेत

मुंबईची जीवन वाहिनी मानली जाणारी मध्य रेल्वेला जवळपास 70 वर्षे पूर्ण झाली आहेत.

Central Railway :  मुंबईची जीवन वाहिनी मानली जाणारी मध्य रेल्वेला जवळपास 70 वर्षे पूर्ण झाली आहेत. ग्रेट इंडियन पेनिन्सुला (GIP) रेल्वेच्या उत्तराधिकारी, मध्य रेल्वेच्या 71 व्या स्थापना दिनानिमित्त मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी रेल्वे प्रवासी, वापरकर्ते व रेल्वे कर्मचाऱ्यांचा सत्कार केला आहे. मध्य रेल्वे दिवसरात्र प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध असते. त्याचप्रमाणे मध्य रेल्वे 70 वर्षे प्रवाशांची सेवा करत आहे. हे खूप अभिमानास्पद आहे.(Railways has completed 70 years, serving the people since 1951)

उल्लेखनीय आहे की आशिया व भारतातील पहिली ट्रेन मुंबई ते ठाणे दरम्यान शनिवार, 16 एप्रिल 1853 रोजी धावली होती.  जसजसा वेळ निघून गेला, ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेचा विस्तार होत गेला.  1900 मध्ये, GIP रेल्वे कंपनी इंडियन मिडलँड रेल्वे कंपनीमध्ये विलीन झाली होती.  त्याची सीमा उत्तरेला दिल्लीपासून, ईशान्येला कानपूर ते अलाहाबादपर्यंत आणि पूर्वेला नागपूरपासून दक्षिण-पूर्वेला रायपूरपर्यंत पसरलेली आहे.  त्यामुळे भारतातील जवळपास सर्व भाग मुंबईशी जोडण्यात आले आहेत.  GIP रेल्वेचे मार्ग मायलेज 1,600 (2575 किमी) होते.

3 राज्यांच्या एकत्रीकरणातून मध्य रेल्वेची निर्मिती

निजाम राज्य, सिंधिया राज्य, ढोलपूर राज्य यांचे एकत्रीकरण करून 5 नोव्हेंबर 1951 रोजी मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली होती.  सध्या मध्य रेल्वेमध्ये मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर व पुणे अशा 5 विभागांचा समावेश आहे.  मध्य रेल्वेचे नेटवर्क महाराष्ट्र, मध्य प्रदेश व कर्नाटक राज्यांमध्ये 4,151 मार्ग किमीवर पसरलेले आहे. यात एकूण 471 रेल्वे स्थानके जोडली गेली आहेत.  मध्य रेल्वेने गेल्या 70 वर्षात अनेक यश संपादन केले आहे.  त्यापैकी काही यशांमध्ये पहिली शताब्दी एक्स्प्रेस, पहिली जन शताब्दी एक्स्प्रेस, पहिली तेजस एक्स्प्रेस व गेल्या वर्षी सुरू झालेली पहिली किसान रेल यांचा समावेश आहे.

मध्य रेल्वेचे सुरुवातीचे लोडिंग जे निर्मितीच्या वेळी 16.58 दशलक्ष टन होते, ते आता 2020-21 मध्ये 62.02 दशलक्ष टन झाले आहे. 2021-22 मध्ये, एप्रिल-ऑक्टोबर या कालावधीत आतापर्यंतचे सर्वाधिक 41.02 दशलक्ष टन मालवाहतुकीचे प्रमाण मध्य रेल्वेने गाठले आहे. तसेच मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवा देखील 1951 मध्ये 519 वरून 2021 मध्ये 1814 पर्यंत वाढल्या आहेत.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments