blogफेमस

Chatpatgyan : बंटाय आपुन चटपट ज्ञान देगा झटपट, पहा कोण आहे हा मुलगा

10 वर्षाचा मुलगा देत आहे लोकांना मोफत ज्ञान! त्याच्याकडे आहे मानसिक आरोग्यापासून ते पगार वाढवण्यापर्यंतचा जुगाड! लोक झाले चटपटच्या बोल्ड स्टाइलचे चाहते!

तुम्हीही धक्काधक्कीचे जीवन जगत असाल किंवा एखाद्या गोष्टीने निराश असाल, तर तुम्हाला तात्काळ ज्ञानाची नक्कीच गरज आहे. ( Chatpatgyan: Bantai will give you instant knowledge instantly, see who this boy is)

खरंतर, स्वतःला चटपट म्हणवणारा हा 10 वर्षांचा मुलगा सध्या सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे.

मुंबईचा राहणारा चटपट आपल्या आकर्षक ज्ञानामुळे इंटरनेट वापरकर्त्यांचे पटपट लक्ष वेधून घेत आहे आणि आपल्या मोटिवेशनल व्हिडिओंद्वारे सर्वांची मने जिंकत आहे. छोटासा चटपट आपल्या मस्त अंदाजाने आणि टपोरी भाषेने तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आणेल.

अलीकडेच, चटपटने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यानी मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल आणि ते सहजपणे कसे हाताळले जाऊ शकतात या विषयावर आपला ज्ञान आणि मत सांगितले आहे

चटपट, त्याच्या इतरांपेक्षा जरा वेगळ्या स्टाईलच्या मार्फत अतिशय वेगाने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करत आहे. ‘अगर टीम का दिमाख है ठंडा, तो सबसे आगे बढ़ेगा अपना धंधा’, या व्हिडिओने सोशल मीडियावर अतिशय खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडिओला 66,000 हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचप्रमाणे चटपट यांनी “मुंबईत भाड्याशिवाय कसे राहायचे?, बॉसकडून पगार कसा वाढवायचा?” अश्या विषयांवर सुद्धा त्यानी आपले ज्ञान दिले आहे.

चटपटच्या या आत्मविश्वास आणि मस्त स्टाइलमुळे लोक त्याच्याकडे आकर्षित होत आहेत.

चटपटने नुकताच इन्स्टाग्रामवर 19K फॉलोअर्सचा प्रवास पूर्ण केला आहे. अशाप्रकारे चटपटच्या आपले ज्ञान देऊन लोकांना प्रेरित करण्याचा लाख मोलाच्या कामाचा प्रवास असाच सुरू राहो व त्याच्या भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी वंटास मुंबई तर्फे हार्दिक शुभेच्छा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chatpat (@chatpatkagyaan)

हे हि वाचा :

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments