
Chhath Puja Update : कामानिमित्त आलेले UP, बिहारमधील नागरिक महाराष्ट्रात स्थायिक झाले व ते ज्याप्रमाणे त्यांच्या गावी छठ पूजा साजरी करतात. त्याच प्रमाणे ते महाराष्ट्रात ही साजरी करतात. महाराष्ट्रातील छठ पूजा, जी नदी, समुद्राच्या पाण्यात सूर्यास्ताच्या वेळी केली जाते. कोरोना प्रादुर्भावामुळे सरकारने काही अटींसह या पूजेला मान्यता दिली आहे.(Big warning from BMC for Chhath Puja in Mumbai, management that BMC will do …)
मुंबईत सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईत छठपूजेला देण्यात आलेल्या मंजुरीमध्ये काही सूचनांसह सुधारणा करण्यात आली आहे. एक मोठा निर्णय घेत BMC ने सुधारित मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटले आहे की, BMC कृत्रिम तलाव बनवण्याची व पूजा संपल्यानंतर ते भरण्याची जबाबदारी हाती घेणार आहे. यापूर्वी BMC ने सर्व आयोजकांना या तलावांच्या बांधकामावर देखरेख ठेवण्याचे आणि नंतर ते भरण्याचे निर्देश दिले होते.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अजूनही कायम आहे. पूजेच्या वेळी गर्दी वाढू नये यासाठी BMC ने सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. BMC ने छठ पूजेसाठी काही पॉइंट्स ठेवले आहेत, तिथे नागरिकांनी सर्व नियम पाळून पूजा करावी. यामध्ये सामाजिक अंतर, खबरदारी म्हणून, समुद्रकिनाऱ्यावर छठपूजेचे सामूहिक मेळावे टाळणे यासारख्या बाबींचा समावेश आहे.
Mumbai: In its revised guidelines for Chhat Puja, BMC notifies that it will take responsibility for making artificial ponds and filling them after Puja is over,
Earlier BMC had directed all organisers to look after the construction of artificial ponds and fill them subsequently
— ANI (@ANI) November 8, 2021
हे ही वाचा :