आपलं शहरबीएमसी

Corona Update : मुंबईत 210 नवे कोरोना रुग्ण,मुंबईत BMC राबवणार सहावे सिरो सर्वेक्षण…

BMC कडून डिसेंबर महिन्याच्या शेवटी सिरो सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात येणार आहे.

Corona Update : मुंबईत सर्वत्र लसीकरण पूर्ण करण्यासाठी BMC मोठ्या प्रमाणात मेहनत घेत आहे. लसीकरणासंदर्भात BMC जानेवारी 2022 मध्ये मुंबईत सिरो सर्वेक्षण करण्याची योजना आखत आहे.  मुंबईत होणारे हे सहावे सिरो सर्वेक्षण आहे. BMC कडून डिसेंबर महिन्याच्या शेवटी सिरो सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात येणार आहे.(210 new corona patients in Mumbai, 6th Siro survey to be conducted by BMC in Mumbai …)

कोरोना लसीकरणाला एक वर्ष पूर्ण होण्यासाठी दोन महिने बाकी आहेत.  तोपर्यंत मुंबईतील 18 वर्षांवरील लोकांच्या लसीकरणाच्या पहिल्या डोसचे उद्दिष्ट पूर्ण केले जाणार आहे.  पूर्वीच्या तुलनेत कोरोनाचे केसेस देखील लक्षणीयरीत्या कमी झाले आहेत, अशा परिस्थितीत BMC सिरो सर्वेक्षणाद्वारे, किती जणांनी कोरोनाविरूद्ध अँटीबॉडी विकसित केल्या आहेत आणि किती नाहीत हे तपासणार आहे.  दरम्यान, मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 210 नवे रुग्ण आढळले आहेत.

डिसेंबरपासून सिरो सर्वेक्षणाचे काम सुरू होणार असल्याचे अतिरिक्त BMC आयुक्त सुरेश काकांणी यांनी सांगितले, सध्या किती नमुने तपासायचे याचा निर्णय झालेला नाही. परंतु सुमारे 7 ते 9 हजार नमुने घेतले जाणार आहेत.

 

राज्यात 751 नवे कोरोना रुग्ण

सोमवारी राज्यात 751 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले, तर 25311 चाचण्यांनंतर मुंबईत 210 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तसेच राज्यात एप्रिल 2020 पासून सर्वात कमी कोरोना रुग्ण आढळले आहेत.  गेल्या 24 तासांत राज्यात 15 कोरोना रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असून, त्यापैकी 5 मुंबईतील आहेत.  राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 13,649 वर पोहोचली असून त्यापैकी 2814 सक्रिय रुग्ण मुंबईतील आहेत.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments