
CR Megablock : मुंबईकर रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. मुंबई विभागातील उपनगरीय नेटवर्कवरील विविध अभियांत्रिकी व देखभालीच्या कामांसाठी रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक असणार आहे.(Today there is a megablock on Central Railway, see what’s routing all day …)
सकाळी 10.48 ते दुपारी 3.36 पर्यंत CSMT हून सुटणाऱ्या डाऊन स्लो सेवा CSMT ते विद्याविहार स्थानकांदरम्यान भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांवर सकाळी 10.48 ते दुपारी 3.36 वाजेपर्यंत जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
घाटकोपरहून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील विद्याविहार ते CSMT दरम्यानची सेवा ही सकाळी 10.40 ते दुपारी 3.52 वाजेपर्यंत अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात या गाड्या थांबतील. CSMT ते वाशी,बेलापूर,पनवेल तसेच पनवेल,बेलापूर,वाशी येथून सकाळी 10.21 ते दुपारी 3.41 पर्यंत CSMT हून सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहेत.
रविवार दि. १४.११.२०२१ रोजी मेगा ब्लॉक pic.twitter.com/eBwWOV8Cxs
— Central Railway (@Central_Railway) November 13, 2021
मेनलाइन व ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी
ब्लॉक कालावधीत CSMT ते कुर्ला व पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष सेवा मेगाब्लॉक दरम्यान चालवल्या जाणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत मेनलाइन आणि ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
हे ही वाचा :