खूप काहीटेक

Eastern Freeway : म्हणून MMRDA करणार ईस्टर्न फ्री वेचा विस्तार, घाटकोपर ते ठाणे एलिव्हेटेड रोड योजना

ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाढती वाहतूक पाहता घाटकोपर ते ठाणे असा एलिव्हेटेड रस्ता तयार करण्याची योजना आहे. 

Eastern Freeway : वाहतूक कोंडीमुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पूर्व मुक्त मार्ग शिवाजी नगर टोकापासून घाटकोपर सिग्नलपर्यंत,तर  कामराज नगर आणि रमाबाई कॉलनीतून जाणार्‍या उन्नत रस्त्याने विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे.(Therefore MMRDA will extend Eastern Freeway, Ghatkopar to Thane Elevated Road Scheme)

MMRDA च्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शिवाजी नगर ते घाटकोपरपर्यंत फ्रीवेचा विस्तार करण्यात येणार होता, मात्र खारफुटीच्या समस्येमुळे तो प्रोजेक्ट पुढे ढकलण्यात आला होता. परंतु,  येथील वाढती वाहतूक पाहता MMRDA ने आता या रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

16.8 किमीचा ईस्टर्न फ्रीवे घाटकोपर येथील पी डी’मेलो रोड व ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला जोडतो.  MMRDA चे नगरविकास मंत्री आणि MMRDA चे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी प्रस्तावित केलेला आराखडाही विचाराधीन आहे.  ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाढती वाहतूक पाहता घाटकोपर ते ठाणे असा एलिव्हेटेड रस्ता तयार करण्याची योजना आहे.  विशेष म्हणजे मुंबई-नागपूर समृद्धी एक्स्प्रेस सुरू झाली की, ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर प्रचंड गर्दी होणार आहे.  अशा स्थितीत ठाण्याहून थेट मुंबईला मुक्त मार्गाने एक उन्नत रस्ता उपलब्ध करण्यात येणार आहे.

2014 मध्ये फ्रीवे बांधकाम

प्राधिकरणाने 2014 मध्ये फ्रीवेचे बांधकाम पूर्ण केले होते.  त्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टकडून जमीन संपादित करण्यात आली होती.  ईस्टर्न फ्री वेला उत्तर आणि दक्षिणेला चार लेन आहेत.  त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली आहे.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments