खूप काहीटेक

Expressway : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग जालना-नांदेड एक्सप्रेस वेला जोडणार,पहा काय आहे नियोजन…

जालना-नांदेड 190 किलोमीटर लांबीचा द्रुतगती मार्ग बांधण्यात येणार आहे.

Expressway : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना-नांदेड द्रुतगती महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा जीआर राज्य सरकारने जारी केला आहे.  सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने जालना-नांदेड 190 किलोमीटर लांबीचा द्रुतगती मार्ग बांधण्यात येणार आहे.(Mumbai-Nagpur Samrudhi Highway will be connected to Jalna-Nanded Expressway, see what is planned …)

बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गाच्या उभारणीसाठी दोन हजार हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे.  हा द्रुतगती मार्ग जालना जिल्ह्यातील जालना, मंठा, परतूर, परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर, परभणी पूर्णा व नांदेड तालुक्यातून जाणार आहे.

प्रवासाचा वेळ कमी

या एक्स्प्रेस वेमुळे मराठवाड्यातील परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यांना थेट कनेक्टिव्हिटी देणार आहे. त्यामुळे औरंगाबाद, पुणे आणि मुंबई या तीन जिल्ह्यांमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. समृद्धी एक्स्प्रेसशी जोडल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचा फायदा शेतकरी, व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य प्रवाशांना होणार आहे.

 

भूसंपादनासाठी परिपत्रक जारी

अशोक चव्हाण यांच्या प्रस्तावावर पायाभूत सुविधा विषयक मंत्रिमंडळ समितीत 8 मार्च 2021 रोजी मंजुरी मिळाल्यानंतर राज्याच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती.  अखेर शुक्रवारी भूसंपादनाचे परिपत्रक जारी करण्यात आले.  जालना-नांदेड द्रुतगती महामार्ग बांधण्याच्या निर्णयाबद्दल अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments