फेमस

Global Vipassana Pagoda : म्हणून बांधण्यात आले हे ग्लोबल विपश्यना पॅगोडा, पहा का मानले जाते शांततेचे प्रतीक…

मुंबईतील एक अद्वितीय आकर्षण म्हणजे ग्लोबल विपश्यना पॅगोडा.

Global Vipassana Pagoda :मुंबई हे एक अद्भूत शहरांपैकी एक मानले जाते. तर ते अनेक प्रसिद्ध वास्तूंसाठी ओळखले जाते. मुंबईतील एक अद्वितीय आकर्षण म्हणजे ग्लोबल विपश्यना पॅगोडा. हे स्मारक भगवान गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानांना श्रद्धांजली म्हणून बांधण्यात आले आहे. ही वास्तू हजारो अभ्यागतांना आकर्षित करते . ग्लोबल विपश्यना पॅगोडा हे शांततेचे निवासस्थान मानले जाते. जर तुम्ही ग्लोबल विपश्यना पॅगोडा या शांत ठिकाणाला आजवर भेट नसेल दिली, तर एकदा नक्की भेट द्या.(So this Global Vipassana Pagoda was built, see why it is considered a symbol of peace …)

ग्लोबल विपश्यना पॅगोडा हे घुमटासारखे आहे. यात सुमारे 8,000 भक्त व विपश्यना अभ्यासकांच्या बसण्याची क्षमता असलेला एक ध्यान हॉल आहे.  8 फेब्रुवारी 2009 रोजी भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पॅगोडाचे उद्घाटन करण्यात आले होते . गोराई खाडी व अरबी समुद्र यांच्यामधील द्वीपकल्पावरील दान केलेल्या जमिनीवर हा पॅगोडा बांधण्यात आला आहे.

जागतिक विपश्यना पॅगोडाचा इतिहास 

ग्लोबल पॅगोडा हे बांधण्याचे नियोजन 1997 मध्ये सुरू झाले होते, परंतु प्रत्यक्ष बांधकाम 2000 मध्येच सुरू झाले. भगवान बुद्धांच्या खऱ्या शिकवणींचा प्रसार करण्यासाठी ग्लोबल पॅगोडा बांधण्याची कल्पना श्री एस.एन.गोएंका यांनी मांडली होती. वर्षानुवर्षे, धार्मिक कट्टरता प्रबळ झाली व धम्माचा योग्य मार्ग विसरला गेला.

हे धडे धार्मिक कट्टरतेने आंधळे झालेल्या लोकांच्या मनात पुन्हा रुजवले पाहिजेत. तसेच जगात सहिष्णुता वाढवण्यासाठी, शांतता आणि सौहार्द राखण्यासाठी सुधारित जीवनशैलीचा परिचय आवश्यक होता. म्हणून या पॅगोडाची स्थापना करण्यात आली. 6 जून 2013 रोजी, ग्लोबल पॅगोडाचा विकास, वास्तुकला व उद्देशासाठी महाराष्ट्रातील सात आश्चर्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

ग्लोबल विपश्यना पॅगोडा हे गोराई, बोरीवली पश्चिम, मुंबई येथे स्थित आहे. हे ध्यान हॉल सकाळी 6.30 ते सायंकाळी 6.45 वाजेपर्यंत  अभ्यागतांसाठी व पर्यटकांसाठी खुले असते. येथे प्रवेश करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments