खूप काही

Green Crackers : मुंबईकरांची ग्रीन फटाक्यांना पसंती; काय आहे यांची खासियत…

सर्वसामान्य फटाक्यांसोबतच मुंबईतील बाजारपेठांमध्ये ग्रीन फटाकेही विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

Green Crackers :मुंबईसह संपूर्ण देशात दिवाळीची धूम पाहायला मिळत आहे. परंतु दिवाळी म्हंटले की, फटाक्यांची आतिषबाजी तर,होणारच. पण पर्यावरणाच्या दृष्टीने काही राज्यांनी त्यांच्या राज्यात सामान्य फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे, परंतु दिवाळीचा सण लक्षात घेऊन त्यांनी त्यांच्या शहरांमध्ये ग्रीन फटाके विकण्यास परवानगी दिली आहे.(Mumbaikars prefer green firecrackers;  What’s so special about …)

सर्वसामान्य फटाक्यांसोबतच मुंबईतील बाजारपेठांमध्ये ग्रीन फटाकेही विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. या फटाक्यांमुळे प्रदूषण कमी होत असल्याने लोकं मोठ्या प्रमाणात ग्रीन फटाके खरेदी करत असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे, हे फटाके पर्यावरणाला पूरक ही आहेत.

ग्रीन फटाक्यांची ही खासियत आहे

ग्रीन फटाके हा राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन केंद्राचा शोध मानला जातो. तज्ज्ञांच्या मते ग्रीन फटाक्यांमध्ये घातक रसायनांचा वापर केला जात नाही. ज्यामुळे पर्यावरणाला कमी हानी पोहोचते व  वायू प्रदूषण कमी करण्यास मदत होते. ग्रीन फटाके 40 ते 50 टक्के कमी हानिकारक वायू तयार करतात. यामध्ये कोणतेही हानिकारक रसायन वापरले जात नाही.

ग्रीन फटाके आकाराने लहान असून आवाजही कमी करतात.  त्यामुळे वायू व ध्वनी प्रदूषण कमी होते. सामान्य फटाक्यांमध्ये 160 डेसिबलपर्यंत ध्वनी प्रदूषण होते, मात्र यावेळी बाजारात उपलब्ध असलेल्या ग्रीन फटाक्यांमध्ये 110 डेसिबलपर्यंत ध्वनी प्रदूषण होत असल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments