आपलं शहरखूप काहीविद्यापीठ

IIM Indore News : आयआयएम इंदोरची मुंबईच्या दिशेने नवी वाटचाल

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) इंदोरची वाटचाल आता मुंबईच्या दिशेने होत आहे .

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) इंदोरची वाटचाल आता मुंबईच्या दिशेने होत आहे .हिरानंदानी नॉलेज पार्क, पवई येथे 20 हजार स्क्वेअर फूट जागेत नवीन अत्याधुनिक कॅम्पस उभारण्यात आला आहे. ही संस्था या आधीपासूनच मुंबईत विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. मंगळवारी आयआयएम इंदोरचे संचालक प्रा.हिमांशू राय, प्रा.सौम्या रंजन, प्रा.सुबिन सुधीर, प्रा.गणेश एन आणि प्रा.आशिष साध यांच्या हस्ते मुंबई कॅम्पसचे उद्घाटन करण्यात आले. (IIM Indore News: IIM Indore’s new journey towards Mumbai )

प्रो.राय म्हणाले की आम्ही व्यवसाय, गव्हर्नन्स, स्ट्रॅटेजिक फायनान्शिअल मॅनेजमेंट, पॉलिटिकल मार्केटिंग मॅनेजमेंट आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटविषयी अनेक अल्प आणि दीर्घकालीन कोर्सेस सुरू केलेच आहेत पण खास बात म्हणजे त्यांचा विस्तार आम्ही UAE मध्ये सुद्धा केला आहे.

आयआयएम इंदोरमध्ये 9 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. यात 100 हून अधिक विद्याशाखा आणि 15 हून अधिक प्रमुख आणि कार्यकारी कार्यक्रम आहेत. यामध्ये आयपीएम या पाच वर्षांच्या व्यवस्थापनातील एकात्मिक कार्यक्रमाला 10 वर्षे पूर्ण झाली असून त्याची मागणी वाढत आहे. सामाजिक उत्तरदायित्वासोबतच ते सरकार आणि प्रशासकीय संस्थांच्या मदतीने राष्ट्र उभारणीतही योगदान देत आहे.

प्रो. राय म्हणाले की, आम्ही डिजिटल साक्षरता आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण सत्र आयोजित केले आहे. स्वप्नांची नगरी म्हणून ओळख असणाऱ्या मुंबईतील एका कॅम्पसमध्ये याची पुन्हा सुरूवात होणार आहे. 20,000 चौरस फुटांवर पसरलेल्या या कॅम्पसमध्ये सात वर्गखोल्या, दोन बोर्ड रूम, एक लिव्हिंग रूम, स्टुडिओ रूम, मनोरंजन कक्ष आणि एक कॅफेटेरिया आहे. लायब्ररीमध्ये 700 पुस्तके आणि ई-बुक्सचा मोठा डेटाबेस आहे. मुंबई कॅम्पसमधील एक्झिक्युटिव्हसाठी प्रमुख स्नातकोत्तर, PGMX , विभिन्न कार्यकारी कार्यक्रम आणि प्रबंध विकास कार्यक्रम कॅम्पसमध्ये आयोजित केले जातील.

 

हे हि वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments