
IND v NZ : भारतात सर्व खेळांपैकी क्रिकेट या खेळाला लोकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती दिली जाते,अशातच आता प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे भारत व न्यूझीलंड (भारत विरुद्ध न्यूझीलंड) यांच्यातील मालिका 17 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. ज्यामध्ये 3 T20 आणि 2 कसोटी सामने समाविष्ट आहेत. कसोटी सामन्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. वास्तविक दुसरा कसोटी सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.(Now India will be roaming the stadium in Mumbai, the big decision of the cricket team)
या सामन्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनची (MCA) इच्छा आहे की, हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये 100 टक्के क्षमतेने प्रेक्षकांना परवानगी देण्यात यावी. यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महाराष्ट्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. तर T20 दुसरा कसोटी सामना 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान होणार आहे.
पहिला T20 सामना जयपूरच्या सवाई मानसिंग इनडोअर स्टेडियमवर होणार आहे, त्यासाठी राजस्थान क्रिकेट असोसिएशनने स्पष्ट केले आहे की, ज्या प्रेक्षकांनी किमान लसीचा एक डोस पूर्ण केला आहे. त्यांनाच हा सामना पाहण्याची परवानगी दिली जाणार आहे. फक्त एवढेच नाही, तर तुम्ही लसीचा डोस घेतल्याचा निगेटिव्ह RT-PCR कोरोना चाचणी अहवाल आणावा लागेल.
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी नाही. तसेच कोरोनामुळे IPL सुद्धा भारताऐवजी यूएईमध्ये झाले. विशेष म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशन प्रदीर्घ कालावधीनंतर एका सामन्याचे आयोजन करणार आहे. शेवटचा सामना मुंबई क्रिकेट असोसिएशनने 2016 मध्ये आयोजित केला होता. त्यानंतर भारताचा इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना झाला होता.
भारत न्यूझीलंडचे वेळापत्रक
भारत विरुद्ध न्यूझीलंड T20 मालिका
पहिला T20 सामना: 17 नोव्हेंबर – जयपूर
दुसरा T20 सामना: 19 नोव्हेंबर – रांची
दुसरा T20 सामना: 21 नोव्हेंबर – कोलकाता
भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिका
पहिली कसोटी: 25 ते 29 नोव्हेंबर – कानपूर
दुसरी कसोटी: 03 ते 07 डिसेंबर – मुंबई
हे ही वाचा :