खूप काही

India Air Pollution : दिल्लीसह प्रदूषणाच्या यादीत मुंबईचा देखील समावेश, प्रदूषणामुळे दिल्लीत लॉकडाऊन…

मायानगरी मुंबईचा AQI 169 असून, मुंबई शहर या यादीत अनुक्रमे  सहाव्या स्थानावर आहे.

India Air Pollution : भारतातील दिल्ली , कोलकत्ता आणि मुंबई या महानगरांचा समावेश आता जगातील 10 प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये झाला आहे . भारताची राजधानी दिल्ली ही प्रदूषणाची केंद्रबिंदू बनली आहे. दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स 556 आहे. जो यादीत वरच्या स्थानावर पोहचला आहे , तसेच चौथ्या क्रमांकावर कोलकत्ता हे शहर असून, या शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स 177 आहे. तर मायानगरी मुंबईचा AQI 169 असून, मुंबई शहर या यादीत अनुक्रमे  सहाव्या स्थानावर आहे.(Mumbai is also included in the list of pollution along with Delhi, lockdown in Delhi due to pollution …)

सर्वात खराब एअर क्वालिटी इंडेक्स  निर्देशांक असलेल्या शहरांमध्ये पाकिस्तानमधील लाहोर व चीनमधील चेंगदू यांचा समावेश आहे. सिस्टम ऑफ एयर क्वालिटी एंड वेदर फोरकास्टिंग एंड रिसर्चने  (सफर) दिलेल्या माहितीनुसार , दिल्लीच्या हवेतील गुणवत्ता शनिवारी सकाळी 499 AIQ होती , तर  प्रदूषकांची हवेतील पातळी 10 PM 2.5 अनुक्रमे 134.72 AQI नोंदवली गेली.

दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाच्या पातळीमुळे सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी दिल्ली- NCR मधील तीव्र वायू प्रदूषणाची गंभीर दखल घेतली आहे. आवश्यक असल्यास सरकारने दिल्लीत  वाहने, फटाके, उद्योगातील धूळ यामुळे देखील मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत असते. अशा परिस्थितीत दिल्लीमध्ये लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्यता आहे .

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments