खूप काहीस्पोर्ट

India v New Zealand : भारत विरुद्ध न्यूझीलंड T20 मालिका,कसोटी मालिकेसाठी कोणाकडे जाणार कर्णधारपद?

न्यूझीलंडविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही. 

India v New Zealand : मैदानांमध्ये सध्या क्रिकेटचे सामने रंगताना दितायेत अशातच आता न्यूझीलंडचा भारत दौरा सुद्धा 17 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.  दोन्ही देशांदरम्यान पहिली 3 T20 (भारत विरुद्ध न्यूझीलंड T20 मालिका) खेळली जाणार आहे.  यासाठी BCCI कडून 16 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.  परंतु विराट कोहलीनंतर आता  कर्णधारपदी रोहित शर्माची निवड झाली असून ,न्यूझीलंडविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही.  याचे कारण म्हणजे कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित किंवा अजिंक्य रहाणे यांच्यापैकी  कसोटी संघाचे कर्णधारपद कोणाच्या हाती सोपवायचे याचा निर्णय अद्याप निवडकर्त्यांना करता आलेला नाही.(India v New Zealand T20 Series, Who will be the captain for the Test series?)

कसोटी संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली दीर्घ रजेवर गेल्याने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याची खेळण्याची शक्यता फार कमी आहे.  त्याच्या अनुपस्थितीत रहाणेने आतापर्यंत कसोटी संघाची कमान सांभाळली आहे.  मात्र, रहाणेचा अलीकडचा फॉर्म चांगला राहिलेला नाही व दुसरीकडे रोहित टी-20 संघाचा कर्णधार झाल्यानंतरही समीकरणे बदलली आहेत.  त्यामुळे कसोटी संघाच्या कर्णधारपदाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

रहाणेच्या फॉर्ममुळे कर्णधारपदाचा पेच

अजिंक्य रहाणेला इंग्लंडविरुद्धच्या 4 कसोटी आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये मोठी खेळी करता आली नाही.  भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा पेचही यामुळे अडकला आहे.  कारण गेल्या वर्षी आपल्या नेतृत्वाखाली भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक मालिका जिंकून देणारा रहाणे तेव्हापासून मौन बाळगून आहे.  तसेच  प्लेइंग-11 मधील त्याच्या स्थानावर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत.  नवीन कर्णधाराबाबत प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मतही निवडकर्त्यांना जाणून घ्यायचे आहे. कारण  द्रविड यांचा दृष्टीकोन निवडकर्त्यांना कर्णधार निवडण्यात मदतीचा ठरेल.

मिळालेल्या माहितीनुसार, कसोटी मालिकेसाठी संघ (Ind vs NZ कसोटी संघ) शुक्रवारी निवडला जाणार आहे, तर  विराट कोहलीच्या अनुपस्थितीत, अजिंक्य रहाणेऐवजी रोहित शर्माला कर्णधारपदासाठी विचारले जाण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments