फेमसस्पोर्ट

IPL 2022 : आयपीएलमध्ये दोन नव्या संघांचा प्रवेश, एका संघाच्या किमतीने केला विक्रम…

आयपीएलमध्ये खेळणाऱ्या आठ संघांमध्ये आता 2 नवीन संघाची भर पडणार आहे.

आयपीएल आपले 14 वर्ष पूर्ण करून आता 15 व्या वर्षात पदार्पण करत आहे. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या आठ संघांमध्ये आता 2 नवीन संघाची भर पडणार आहे. (IPL 2022: Two new teams enter IPL, set a record for the price of one team …)

आयपीएल 2022 ची तयारी सुरू आहे. यावेळी पुन्हा दहा संघ आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहेत. जे आठ संघ आधीच खेळत होते ते तर खेळणारच आहेत पण त्यात आणखीन दोन नवे संघही सामील होत आहेत. लखनऊ आणि अहमदाबाद नावचे दोन संघ , आपल्याला आयपीएलच्या मैदानात खेळताना या सिझन पासून दिसणार आहेत .

आयपीएलमध्ये दहा संघ खेळण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2011 मध्येही आयपीएलमध्ये दहा संघ सहभागी झाले होते. मात्र, नंतर पुन्हा आठ संघ आले. बरोबर दहा वर्षांनंतर पुन्हा दहा संघ होत आहेत. आयपीएलला आतापर्यंत 14 वर्षे झाली आहेत, आता आपण 15व्या वर्षात प्रवेश करत आहोत. असे मानले जाते की जानेवारी 2022 मध्ये एक मेगा ऑक्‍शन होईल, त्यानंतर आयपीएलचा सिझन मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलमध्ये सुरू होईल. या 14 वर्षांत अनेक संघ आले आणि गेले, तर काही संघ असे आहेत जे पहिल्या आयपीएलच्या सिझनपासून आतापर्यंत लगातार खेळत आले आहेत. पण या वर्षी दोन नवीन संघांचा झालेला ऑक्‍शन आश्चर्यकारक होता. या वर्षी ते घडले, ज्याचा कदाचित अंदाजही आला नव्हता. यंदा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा संघ आपल्याला मिळाला. या संघाची किंमत एवढी आहे की किंमत ऐकुन ऐकणाऱ्याची तारांबळ उडेल.

लखनऊ आणि अहमदाबादने यंदाच्या आयपीएलमध्ये प्रवेश केला आहे. सर्वप्रथम आयपीएलच्या सर्वात स्वस्त संघाबद्दल बोलूया. राजस्थान रॉयल्स या संघाने पहिल्याच सत्रात ट्रॉफी जिंकून खळबळ उडवून दिली होती. या संघाची किंमत सर्वात कमी आहे. हा संघ 502 कोटी रुपयांना विकत घेण्यात आला. यानंतरचा जो संघ आहे, त्याचे नाव कोलकाता नाईट रायडर्स आहे, ज्याने आतापर्यंत दोनदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. त्याची किंमत 563 कोटी रुपये आहे. यानंतर पंजाब किंग्सचा क्रमांक लागतो. पूर्वी या संघाचे नाव किंग्ज इलेव्हन पंजाब होते, परंतु नंतर हे नाव बदलून पंजाब किंग्स करण्यात आले. नाव बदलल्यानंतरही या संघाने एकदाही ट्रॉफी जिंकलेली नाही. या संघाची किंमत 570 कोटी रुपये आहे. दिल्ली कॅपिटल्स हा एक संघ आहे जो ट्रॉफी जिंकण्यासाठी अजून सुद्धा तळमळत आहे . या संघाने त्याचे नाव बदलून दिल्ली डेअरडेव्हिल्सपासून दिल्ली कॅपिटल्स केले. त्याची किंमत 630 कोटी रुपये आहे. सर्वात महागड्या संघांमध्ये आता चर्चा आहे ती चेन्नई सुपर किंग्सची, ज्याचा कर्णधार एमएस धोनी आहे. या संघाला मध्यंतरी दोन वर्षांसाठी निलंबितही करण्यात आले होते, त्यानंतर ते परत आले. या संघाने आतापर्यंत चार वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. या संघाची किंमत 682 कोटी रुपये आहे. यानंतर हैदराबादचा संघ आहे, ज्याला आपण सनरायझर्स हैदराबाद म्हणून ओळखतो. या संघाची किंमत 802 कोटी रुपये आहे.

आता आयपीएलच्या सर्वात महागड्या पाच संघांबद्दल बोलूया. त्यामध्ये आरसीबीचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. हा संघही असाच आहे, जो पहिल्या आयपीएलपासून आतापर्यंत खेळत आहे, पण ट्रॉफी जिंकण्याचे भाग्य अद्याप मिळालेले नाही. या संघाची किंमत 837 कोटी रुपये आहे. चौथा सर्वात महागडा संघ मुंबईचा आहे. आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने आतापर्यंत पाच वेळा ट्रॉफी जिंकली आहे, जी आतापर्यंत कोणालाही करता आलेली नाही. या संघाची किंमत 839 कोटी रुपये आहे. दुसरा सर्वात महागडा संघ आता अहमदाबादचा बनला आहे, जो या वर्षी 5625 कोटी रुपयांना विकत घेण्यात आला आहे . त्याची किंमत अचानक खूप वाढली आहे. अहमदाबादचा संघ प्रथमच आयपीएलमध्ये सहभागी होणार आहे. आता आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागड्या संघाबद्दल बोलूया. हा लखनऊचा संघ आहे, जो या वर्षी विकत घेण्यात आला असून त्यासाठी विक्रमी किंमत मोजण्यात आली आहे. या संघाची किंमत 7090 कोटी आहे. जो एक विक्रम आहे. येथे नमूद केलेल्या आठ संघांच्या किमती त्या खरेदी केलेल्या त्यावेळच्या असल्या तरी आता या सर्व संघांच्या किमतीही खूप वाढल्या आहेत. पण इथे हेही लक्षात ठेवायला हवे की, कोणताही संघ त्याच्या किंमतीने मोठा होत नाही. विजेतेपद मिळवून आणि खेळाडूंच्या कामगिरीने संघ मोठा होतो. पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये आठ जुने दोन नवे संघ कामगिरी कशी करतात हे पाहावे लागेल.

हे हि वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments