फेमस

Jama Masjid : जामा मशिदीबद्दल मोठं सत्य, नेमकं एवढं महत्त्व का आहे

छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर, उभी असलेली प्रसिद्ध जामा मशीद ही शुक्रवार मशीद म्हणून देखील ओळखली जाते.

Jama Masjid : मुंबईतील अनेक प्रसिद्ध वास्तूंपैकी एक प्रसिद्ध वास्तू म्हणजे मुंबईतील लोकप्रिय जामा मशीद.  छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर, उभी असलेली प्रसिद्ध जामा मशीद ही शुक्रवार मशीद म्हणून देखील ओळखली जाते.  ही स्वप्नांच्या नगरीतील सर्वात जुनी मशीद आहे. मशीद मुंबईच्या दक्षिण भागात क्रॉफर्ड मार्केटजवळील प्रसिद्ध शेख मेनन स्ट्रीटवर भव्यपणे उभी आहे. (The big truth about Jama Masjid is why it is so important)

मशिदीमध्ये सुंदर व गुंतागुंतीचे कोरीवकाम, आकर्षक कलाकृती व संगमरवरी दगडी बांधकाम  असून तिच्याशी एक आकर्षक इतिहास जोडलेला आहे.  आनंददायी एकांतात या मशिदीची एक दिवसाची सहल तुम्हाला आरामशीर व शांत करणारी ठरेल. ही मशीद मुंबईतील लोकप्रिय तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे.

जामा मशिदीचा इतिहास 

असे म्हटले जाते की जामा मशीद प्रथम डोंगरीजवळ वसलेली होती व नंतर ती क्रॉफर्ड मार्केटजवळ  हलवण्यात आली. परंतु 1770 मध्ये, गव्हर्नर विल्यम हॉर्नबी यांनी मशीद नष्ट केली. 18 व्या शतकात या ठिकाणी बागांच्या मधोमध एक मोठी पाण्याची टाकी (जलसाठा) एका कोकणी मुस्लिम व्यापाऱ्याच्या मालकीची होती. 1775 मध्ये त्या कोकणी मुस्लिम व्यापाऱ्याने टाकी अबाधित ठेवण्याच्या अटीवर या जागेवर मशीद उभारण्यास सहमती दर्शविली. सध्याच्या जामा मशिदीची रचना 1775 मध्ये सुरू झाली आणि बांधकाम 1802 मध्ये पूर्ण झाले.

आकर्षक बांधकाम

मशीद ही चौकोनी इमारत असून ती विटांची व दगडांनी बांधलेली आहे. ज्याला गच्चीच्या छताच्या व दुमजली इमारतींनी वेढले आहे. मुख्य पूर्वेकडील दरवाजा हा सुमारे 10 फूट पाण्याने भरलेल्या प्राचीन टाकीकडे जातो. टाकीला तळाशी असलेल्या झऱ्यांद्वारे पाणी दिले जाते. ज्यात सोने, चांदीचे मासे आणि काही कासवे पाहायला मिळतील. याचा उपयोग धार्मिक विधींसाठी केला जातो. मात्र यासाठी आधुनिक सुविधाही उपलब्ध आहेत.

जामा मशिदीचे मुख्य गेट अभ्यागतांना थेट जुन्या टाकीच्या मोकळ्या अंगणात घेऊन जाते, जे आता दगडी पायऱ्या व तटबंधांनी सुसज्ज आहे. मशिदीच्या संपूर्ण संरचनेला आधार देण्यासाठी टाक्यातून सोळा काळ्या दगडी कमानी निघतात. टाकीतील या कमानी 1874 मध्ये बांधण्यात आल्या होत्या.  मशिदीला वरच्या मजल्याला लाकडी खांबांच्या पाच रांगांनी आधार दिला आहे, प्रत्येकामध्ये पवित्र पुस्तके ठेवण्यासाठी एक भांडे आहे.

जामा मशिदीच्या उत्तर, दक्षिण व पूर्वेला 1898 मध्ये काही मोठ्या खिडक्या जोडल्या गेल्या. त्याच संकुलात एक मदरसा मुहम्मदिया देखील आहे. या मदरशाचे उद्दिष्ट मुस्लिम तरुणांना मोफत धार्मिक व धर्मनिरपेक्ष शिक्षण देणे हे आहे. तसेच त्याच्याशी संलग्न वसतिगृह आहे. 1980 पासून, दुर्मिळ हस्तलिखितांसह एक विस्तृत ग्रंथालय मशिदीशी संलग्न आहे. एप्रिल 2015 मध्ये या ग्रंथालयाचे उद्घाटन झाले तेव्हा या ग्रंथालयाचे पूर्णपणे नूतनीकरण करून हे ग्रंथालय पहिल्या मजल्यावर हलवण्यात आले. ग्रंथालयाचा संपूर्ण संग्रह आता डिजीटल झाला आहे.

मुंबईतील ही प्रसिद्ध जामा मशीद शेख मेमन सेंट, चिप्पी चाळ, काळबादेवी, मुंबई येथे स्थित आहे. ही मशीद भाविकांसाठी सकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुली असते.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments