खूप काही

Job Update : भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) येथे नोकरीची संधी,असे कराल अप्लाय…

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) येथे विविध पदांसाठी भरती होणार आहे.

Job Update : तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? तर तुमच्यासाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे.  भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) येथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी भोपाळ, मुंबई, पुणे, नागपूर येथे 27 जागा रिक्त आहेत.  भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) त्यांच्या अधिसूचनेत या नोकरी संबंधित सर्व माहिती दिली आहे.(Job Opportunity at Airports Authority of India (AAI), Apply …)

इच्छुक उमेदवारांनी या पदासाठी या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आहे, तर कमाल वय 26 वर्षे निश्चित केले आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपल्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी कारण अर्ज करण्याची सुरुवात 1 नोव्हेंबर 2021 पासून सुरू झाली आहे, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख  30 नोव्हेंबर 2021 पर्यंत आहे.

पात्रता व निवड प्रक्रिया

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) च्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना ITI पात्रतेसह 10 वी पास असणे आवश्यक आहे. तसेच या पदांवरील उमेदवारांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहे. तर नोकरीचे ठिकाण भोपाळ, मुंबई, पुणे, नागपूर, सुरत, वडोदरा इत्यादी ठिकाणी आहे.

अर्ज प्रक्रिया

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) च्या  अधिक माहितीसाठी https://www.aai.aeroया लिंकवर क्लिक करा.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments