खूप काही

Johnny Walker Birth Anniversary : काशी मिळवली जॉनी वॉकर यांनी कॉमेडी किंग म्हणून ओळख, कसे ठरले उत्तम अभिनेता…

एक वेळ अशी आली जेव्हा जॉनी वॉकरला कुटुंबासाठी बस कंडक्टर म्हणून काम करावे लागले होते.

Johnny Walker Birth Anniversary : आपल्या उत्तम विनोदाने संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारा  एक प्रसिद्ध अभिनेता म्हणजे ‘कॉमेडी किंग’ जॉनी वॉकर. हिंदी सिनेमांमध्ये उत्तम अभिनय करत त्यांनी कॉमेडी किंग म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. व प्रेक्षकांची मने जिंकत लोकांच्या मनावर गेली अनेक वर्षे त्यांनी राज केले. हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चे स्थान निर्माण करणाऱ्या जॉनी वॉकर यांचा आज आहे वाढदिवस.(Johnny Walker is known as the comedy king, how he became a great actor …)

जॉनी वॉकर यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1926 रोजी इंदूर येथे झाला.  त्यांचे खरे नाव बदरुद्दीन जमालुद्दीन होते.  जॉनी वॉकर  यांनी 29 जुलै 2003 रोजी मुंबईत  अखेरचा श्वास घेतला.  हा अभिनेता अनेक उत्तम चित्रपटांमध्ये दमदार कॉमेडी करताना दिसला आहे.  चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखा प्रेक्षकांना नेहमीच आवडली होती.  50 ते 60 च्या दशकापर्यंत जॉनी वॉकरने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.

जॉनी वॉकर यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.  घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे तेही आपल्या वडिलांसोबत काम करत असायचे.  वडिलांचा कारखाना बंद झाल्यानंतर जॉनी वॉकरचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले.  एक वेळ अशी आली जेव्हा जॉनी वॉकरला कुटुंबासाठी बस कंडक्टर म्हणून काम करावे लागले होते. त्याकाळी कंडक्टर म्हणून त्यांना 26 रुपये पगार मिळत होता.

यादरम्यान अभिनेता बलराज साहनी यांची नजर जॉनी वॉकरवर पडली.  संभाषणानंतर साहनी यांनी दिग्दर्शक गुरु दत्त यांच्याशी जॉनी वॉकरबद्दल बोलले.  तेव्हा, गुरु दत्त त्याच्या आगामी बाजी या चित्रपटाची तयारी करत होते.  त्यानंतर गुरू दत्तने जॉनी वॉकरला एका दारुड्याच्या भूमिकेची ऑफर दिली, जी त्याने खूप चांगल्या प्रकारे साकारली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nasirr Khan (@khanasirr)

 

‘बाजी’ या सिनेमात त्यांनी साकारलेल्या मद्यपी व्यक्तिरेखेनंतर हा अभिनेता अनेक चित्रपटांमध्ये अशाच भूमिकांमध्ये दिसला.  जाल, मुगल-ए-आझम, मेरे मेहबूब, बहू बेगम, मेरे हुजूर, टॅक्सी ड्रायव्हर, देवदास, मधुमती आणि नया अंदाज यांसारख्या चित्रपटांनी जॉनी वॉकरच्या अभिनय कारकिर्दीला उंचीवर आणले.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments