
हिंदिसिनेमासृष्टीची सुप्रसिध्द अभिनेत्री कंगना राणौत पुन्हा एका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे . एका मुलाखतीच्या कार्यक्रमात कंगनाने केलेल्या वक्तव्याने भारतीयांच्या भावनांना फार मोठी ठेच पोहचली आहे .”कंगना राणौत” आता एक चर्चेचा विषय बनला आहे. (Kangna Ranaut: Kishori Pednekar’s response to Kangana’s statement…)
कंगना राणौतने देशाच्या स्वातंत्र्याविषयी केलेल्या वक्तव्याचा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी निषेध केला आहे. प्लास्टिकच्या घोड्यावर बसून झाशी की रानी हा चित्रपट बनवणाऱ्या अभिनेत्रीला पद्मश्री पुरस्कार देणे हा संपूर्ण भारताचा अपमान असल्याचे ते म्हणाले.कंगनावर निशाणा साधत तिच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
सोमवारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कंगना राणौतच्या ‘1947 ला भारताला स्वातंत्र्य नसून तर भीक मिळाली होती, खरे स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळाले होते’ या वक्तव्याचा समाचार घेतला.
कंगना दर तीन महिन्यांनी चर्चेत असते. त्यांनी कंगनाला फटकारले की, “तिचा जन्म कुठे झाला, ती कुठे जगते. आणि मुंबई व महाराष्ट्राचा पाकिस्तानशी काय संबंध?”
किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, “ज्यांनी आपल्या देशासाठी, महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी बलिदान दिले, ते कोणत्याही एका समाजाचे नव्हते. सर्व जाती धर्माचे होते. कंगनाचे बेताल वक्तव्य म्हणजे या सर्व पीडितांचा अपमान आहे. आपल्या देशात अनेक लोक आहेत. ते उत्तम काम करतात. परंतु , पद्मश्री पुरस्कारामागील प्रतिभा मला समजत नाही. अशा अभिनेत्रीला पद्मश्री देणे हा भारताचा अपमान आहे.”
महापौर पेडणेकर म्हणाल्या की, “राजकारण, अराजकता आणि समाजाच्या प्रत्येक स्तरातून कंगनाला विरोध होत आहे. मी गृहखात्याला विनंती करते की, अशा बेताल मुलीकडे लक्ष द्यावे. जी संपूर्ण भारताचा अपमान करते. सर्व लोकांना विभाजित करते. ती कोणत्याही बाबतीत ढवळाढवळ करून आमच्या शहिदांचा अपमान करत असेल तर आम्हाला आमच्या न्यायिक बाजूने विरोध करावा लागेल. तिच्यावर कारवाई करून विषय संपवावा.”
हे ही वाचा :