खूप काही

Mumbai Air Pollution : मुंबईच्या हवेची गुणवत्ता घटली, होऊ शकतो मोठा परिणाम

बुधवारी मुंबईतील हवेची गुणवत्ता 204 AQI नोंदवली गेली, जी खराब श्रेणीत मोडते.

Mumbai Air Pollution : यंदा दिवाळी सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. परंतु सर्वत्र दिवाळीनिमित्त फटाकेही मोठ्या प्रमाणात फोडले जात आहेत. त्याचबरोबर दिवाळी सुरू होताच मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावू लागली आहे.  बुधवारी मुंबईतील हवेची गुणवत्ता 204 AQI नोंदवली गेली, जी खराब श्रेणीत मोडते. तज्ज्ञांच्या मते, गुरुवारीही हवेची पातळी खराब होऊ शकते.(Decreased air quality in Mumbai could have major consequences)

गेल्या वर्षी कोरोना संबंधित निर्बंधांमुळे दीपावलीचा सण हा अत्यंत सध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. अशा परिस्थितीत हवेची गुणवत्ताही चांगली होती, पण यावेळी कोरोनाचा धोका कमी झाल्यामुळे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत.  अशा परिस्थितीत लोक दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत.  बुधवारी शहरात फारशी फटाक्यांची आतषबाजी झाली नसली तरी मुंबईतील हवेची गुणवत्ता खराब झाल्याचे दिसून येते.

शहरातील खराब हवेची पातळी

हवेच्या गुणवत्तेवर नजर ठेवणाऱ्या सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) नुसार बुधवारी मुंबईत हवेची सरासरी 204 AQI नोंदवली गेली आहे.  निर्धारित मानकांनुसार, वरील आकडेवारीवरून शहरातील हवेची पातळी खराब असल्याचे दिसून येते.  SAFAR च्या अंदाजानुसार, गुरुवारी देखील मुंबईतील हवेच्या गुणवत्तेची पातळी खूपच खराब असेल.  हवेची गुणवत्ता पातळी सुमारे 307 AQI पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

मुंबई शहरातील इतर भागातील हवा गुणवत्ता

<span;> मालाड – 211 AQI,  कुलाबा – 318 AQI, चेंबूर – 200 AQI, अंधेरी – 1169 AQI,  BKC – 301 AQI, बोरिवली – 149 AQI, माझगाव – 322 AQI,  वरळी- 101 AQI,  भांडुप – 108 AQI अशी हवेची पातळी नोंदवली गेली आहे.

हवेच्या गुणवत्तेचे मोजमाप

<span;> 0 ते 50 AQI – चांगले,  51 ते 100 AQI – ठीक आहे,  101 ते 200 AQI – मध्यम,  201 ते 300 AQI – खराब,  301 ते 400 AQI – अत्यंत खराब, 400 च्या वर – गंभीर.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments