Mumbai Air Pollution : दिवाळीला मुंबई झाली शानदार, प्रदूषणातून मुक्ततेकडे
SAFAR ने अंदाज वर्तवला आहे की शहरातील वायू व ध्वनी प्रदूषण पातळी वाढेल.

Mumbai Air Pollution : दिवाळीनिमित्त मुंबईमध्ये ध्वनी व वायू प्रदूषणाची पातळी वाढेल असं सांगण्यात आलं होतं, परंतु दिवाळीच्या रात्री प्रचंड प्रदूषणाचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी, गुरुवारी रात्री मुंबईत हवा गुणवत्ता निर्देशांक 150 ते 165 च्या आसपास होता. दिवाळीनिमित्त प्रदूषणाबाबत वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई शहरात हवा गुणवत्ता मध्यम श्रेणीत होती.(On Diwali, Mumbai became glorious, free from pollution)
दिवाळीच्या रात्री मुंबईचे तापमान, आर्द्रता व वाऱ्याचा वेग जवळपास सामान्य होता. या आठवड्याच्या सुरुवातीच्या माहितीनुसार, शहराचा AQI खराब श्रेणीत होता, म्हणजे 201 ते 300 दरम्यान. मुंबईला 300 च्या वर AQI ला स्पर्श करण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता, जो अत्यंत निकृष्ट दर्जाचा मानला जातो, ज्यामुळे दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास श्वसनाचे आजार होण्याची शक्यता आहे.
SAFAR ने अंदाज वर्तवला आहे की शहरातील वायू व ध्वनी प्रदूषण पातळी वाढेल. तसेच गुरुवारी रात्री ते शुक्रवार सकाळ दरम्यान अत्यंत खराब श्रेणीपर्यंत पोहोचेल. SAFAR च्या AQI अंदाजानुसार नवी मुंबई, BKC आणि चेंबूर हे 4 नोव्हेंबर व 5 नोव्हेंबर या दोन्ही दिवशी सर्वाधिक प्रदूषित क्षेत्रे असण्याची अपेक्षा आहे.
हे ही वाचा :