खूप काहीहेल्थ

Mumbai Air Pollution : म्हणून मुंबईत वायू प्रदूषण कमी,SAFAR ने सांगितले कारण…

मुंबईतील हवेचा दर्जा निर्देशांक (AQI) मध्यम श्रेणीत राहिला आहे.

Mumbai Air Pollution : दिल्ली हे भारतातील अति प्रदूषित शहर आहे. पुन्हा एकदा दिवाळीच्या निमित्ताने दिल्ली गॅस चेंबर कायम आहे.  तेथे हवेतील प्रदूषणाची पातळी चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे.  मुंबईबद्दल बोलायचे झाले, तर ही दिवाळी मुंबईत शांत राहिली. म्हणजे फटाक्यांचा आवाज कमी झाला.(So air pollution in Mumbai is less, SAFAR said because …)

सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) नुसार, मुंबईत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे हवेच्या गुणवत्तेवर परिणाम झाला असला तरी मुंबईतील हवेचा दर्जा निर्देशांक (AQI) मध्यम श्रेणीत राहिला आहे.

काही दिवसांपूर्वी, SAFAR ने असा अंदाज वर्तवला होता की यावेळी देखील मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवाळीच्या रात्री व दुसऱ्या दिवशी दुपारी ‘अत्यंत खराब’ श्रेणीत पोहोचू शकते.  नवी मुंबई, बीकेसी आणि चेंबूर हे सर्वाधिक प्रदूषित क्षेत्र असू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

SAFAR चे संस्थापक गुफरान बेग म्हणाले की, मुंबईतील प्रदूषण कमी होण्याचे एक कारण म्हणजे समुद्रातून येणारे वेगवान वारे. दिवाळीच्या रात्री साधारणतः एक वाजल्यानंतर प्रदूषणाची पातळी वाढते.  मात्र, मुंबई समुद्राच्या अगदी जवळ असून तेथून येणाऱ्या जोरदार वाऱ्याचा एक फायदा म्हणजे वाऱ्याने प्रदूषण वाहून जाते.

तसेच काही भागात दिवाळीनंतर शहरात पावसाने हजेरी लावल्याने प्रदूषणाची पातळी कमी झाली. SAFAR चे गुफरान बेग असेही म्हणतात की, मुंबई समुद्रकाठी असल्याने ती भाग्यवान आहे, जर मुंबईला समुद्रकिनारा नसता, तर इथला AQI दिल्लीपेक्षा वाईट झाला असता.

विशेष म्हणजे, या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच, मुंबईचा AQI खराब श्रेणीत 201-300 होता. तसेच  मध्यम AQI मुळे फुफ्फुस आणि हृदयाचे आजार असलेल्या लोकांना, वृद्ध लोकांना व लहान मुलांना ही श्वास घेण्यास त्रास होतो.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments