आपलं शहरबीएमसीहेल्थ

Mumbai BMC News : डासांना मारण्यासाठी BMC कडून चक्क 30 कोटी 37 लाखांचा खर्च

कीटकनाशकांच्या वाढीमुळे बीएमसीला औषध खरेदीसाठी अतिरिक्त 3 कोटी रुपये मोजावे लागत आहेत.

इंधन दरवाढीचा फटका सर्वांनाच बसत आहे. त्याचप्रमाणे बीएमसीलाही महागाईचा फटका बसला आहे. कीटकनाशकांच्या वाढीमुळे बीएमसीला औषध खरेदीसाठी अतिरिक्त 3 कोटी रुपये मोजावे लागत आहेत.मुंबई शहरातील डास आणि डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाठी बीएमसीकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. डासांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी केली जाते, मात्र त्यांच्या किमती वाढल्याने अतिरिक्त खर्च होत आहे.(Mumbai BMC News: BMC spends Rs 30.37 crore to kill mosquitoes)

मुंबईत पावसाळ्यात उद्भवणाऱ्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दरवर्षी बीएमसीच्या पेस्ट कंट्रोल विभागाकडून विशेष उपाययोजना केल्या जातात. पावसाळ्यात शहरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आदी आजार डोके वर काढतात. हे आजार टाळण्यासाठी बीएमसी उघड्या पाण्यात आणि गटारात औषध फवारते. कीटकनाशक तेलात मिसळून फवारणी करावी लागते. डास आणि अळ्या मारल्या जातात.

बीएमसीच्या कीटकनाशक विभागाने 2019-22 या तीन वर्षांच्या कालावधीसाठी 33 लाख लिटर कीटकनाशक तेल प्रतिवर्ष 11 लाख लिटर या दराने खरेदी केले होते. तेलाचा दर 82.60 रुपये प्रतिलिटर होता. यापैकी बीएमसीने इंडियन ऑईल कॉर्पोरेशनला 27 कोटी 25 लाख रुपये दिले आहेत. हा करार 31 मार्च 2022 रोजी संपत आहे, म्हणून BMC ने नवीन करार करण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु तेलाची किंमत 92.04 लीटरवर गेली आहे. या खरेदीसाठी बीएमसीकडून 30 कोटी 37 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत.

 

हे हि वाचा :

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments