
जगभरात हाहाकार माजवनारा कोरोना आता कुठे कमी होण्याच्या वाटेवर होता, मात्र त्यातच आता अजून एका व्हि़रिएंटमुळे चर्चांना उधाण आलं आहे. कोरोनाचा नवा प्रकार म्हणून समोर आलेल्या मोनिक्रोनमुळे अनेकजण धास्तावले आहेत. मुंबईतदेखील या व्हेरिएंटची धास्ती घेतली जात आहे. (Mumbai Corona News: Will Monicron come to Mumbai? What’s Corona’s situation right now)
दक्षिण आफ्रिकेत सापडलेला मोनिक्रोन भारतात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही, कारण त्या देशातून अनेक फ्लाईट्स थेट मुंबईत येत असतात. अशामुळे मुंबई पालिकेनेही सतर्कतेची भूमिका घेतली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीदेखील याबाबत खुलासा केला आहे. नव्या व्हेरिएंटच्या संबंधित पालिका पुर्णपणे तयारीमध्ये असेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
मुंबईत रविवारी 28 नोव्हेंबर रोजी कोरोना व्हायरसची 217 नवीन प्रकरणे आणि चार मृत्यूंची नोंद झाली. यासह, शहरातील एकूण मृतांची संख्या 16,330 आहे. रविवारी एकूण 247 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, ज्यामुळे बरे झालेल्यांची संख्या 7,41,500 वर आली.
मुंबई महानगरपालिका हद्दीत आजपर्यंत एकूण 7,62,584 कोरोना रुग्णांची संख्या नोंदवण्यात आली आहे.त्यातील एकूण 7,41,515 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मृत्यूचा तांडव घालणाऱ्या कोरोणाचा वेग जरी मुंबईत मंदावत असला तरी त्याने आजपर्यंत एकूण 16,330 रुग्णांचा बळी घेतला आहे . मुंबई शहरात ॲक्टिव रुग्णांची संख्या 2,192 वर आली आहे.
हे हि वाचा :