
संपूर्ण जगभर कोरोनाचे संकट येऊन सलग 2 वर्ष झाली असून, तेव्हापासून आपल्यावर अधिपत्य गाजवणारी महाभयंकर साथ आता परतीच्या वाटेवर आहे . या कोरोना महामारीत देशाची आर्थिक राजधानी म्हणून नावजलेली मुंबई, कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून देशभर प्रसिद्ध होती. परंतु, कोरोनाचा वेग हळूहळू मंदावताना दिसत आहे. मुंबईसारखे महानगरदेखील कोरोनावर विजयप्राप्ती करण्यात यशस्वी ठरत आहे. (Mumbai Corona update: Good News Mumbaikar, Corona will soon disappear from Mumbai …)
मुंबईत कोरोना कमी होत चालला आहे. मुंबई शहरात कोरोनासाठी राखीव असलेल्या एकूण खाटांपैकी 94% खाटा आता रिकाम्या आहेत. मुंबईत कोरोनाचे 2,823 सक्रिय रुग्ण असले तरी त्यापैकी 1,524 रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे किंवा आरोग्य समस्या नाहीत.
मुंबईतील कोरोना रुग्णांसाठी, शहरातील 23,000 कोविड खाटांपैकी केवळ 1,500 खाटांवर उपचार सुरू आहेत. कमी रुग्ण असल्यामुळे, 11 जंबो सेंटरपैकी फक्त काहीच सेंटर कार्यरत आहेत, उर्वरित केंद्रे स्टँडबायवर ठेवण्यात आली आहेत. जंबो सेंटरमध्ये 6000 खाटांवर फक्त 300 रुग्णांवर उपचार केले जात आहेत. कोरोना रुग्णांची कमी होत चाललेली संख्या, त्यातही रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता, ही दिलासादायक बाब आहे.
जरी कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी जनतेने कोरोनाचे नियम पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे.
अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश कांकाणी म्हणाले की, कोविडचे रुग्ण लक्षणीयरीत्या कमी झाले आहेत, लसीकरणामुळे लोकांमध्ये कुठेतरी रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली आहे. तसेच सक्रिय रूग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस कमी होत आहे, परंतु तरीही हे संकट अजून टळले नाही. त्यामुळे नागरिकांनी सर्व कोरोना नियमांचे पालन करून कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करावे.
मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत 16,292 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, आता मुंबईतील मृतांचा आकडाही एक अंकी पोहोचला आहे. एकेकाळी मुंबईत कोरोनामुळे सुमारे एक हजार इमारती सील करण्यात आल्या होत्या, मात्र आता त्यांची संख्या 15 झाली आहे . झोपडपट्ट्यांप्रमाणेच इमारतीही कोरोनामुक्त होत आहेत, तरीही अजून हजारो मजले सीलबंद आहेत.
हे ही वाचा :
- Kangna Ranaut : कंगनाच्या त्या वक्तव्याला किशोरी पेडणेकर यांचा जवाब…
- Western Railway : पश्चिम रेल्वेत 12 ऐवजी धावणार 20 AC लोकल,भाडेही कमी होण्याची शक्यता…
- India Air Pollution : दिल्लीसह प्रदूषणाच्या यादीत मुंबईचा देखील समावेश, प्रदूषणामुळे दिल्लीत लॉकडाऊन…