खूप काहीहेल्थ

Mumbai Corona Update : मुंबईतून कोरोना परतीच्या वाटेत,शनिवारी केवळ 195 नवीन रुग्ण…

मात्र मुंबईत शनिवारी 37661 चाचण्या होऊनही केवळ 195 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत,

Mumbai Corona Update : मुंबईसह संपूर्ण भारतात कोरोनाने गेले अनेक महिन्यांपासून थैमान घातले होते. परंतु कोरोना आता आटोक्यात येताना दिसत आहे. कोरोना रुग्णांच्या बाबतीत मुंबई हे सर्वात प्रभावी क्षेत्र होते,मात्र मुंबईत शनिवारी 37661 चाचण्या होऊनही केवळ 195 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर राज्यात 833 नवीन कोविड रुग्ण आढळले आहेत.(On the way back to Corona from Mumbai, only 195 new patients on Saturday …)

गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनामुळे 15 जणांना आपला जीव गमवावा लागला असून, त्यापैकी एकाचा मृत्यू मुंबईत झाला आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 10,249 वर आली असून त्यापैकी 2649 सक्रिय रुग्ण मुंबईत आहेत.

मुंबईची आकडेवारी

मुंबईत आतापर्यंत एकूण 121,08,846 चाचण्या झाल्या असून त्यापैकी एकूण 760933  पॉझिटिव्ह केसेस आहेत,तर एकूण 16303 जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले. तसेच मुंबईत आतापर्यंत कोरोना पासून पूर्णपणे बरे होणाऱ्यांची 739426 इतकी संख्या आहे. घटत्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील चाळ/झोपडपट्टी सील मुक्त झाल्या आहेत. तर आता फक्त मुंबईत एकूण 13 इमारती सीलल आहेत.

 

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments