आपलं शहरखूप काहीनॉलेजबीएमसीमंत्रालयहेल्थ

Mumbai Corona Update : लस घेण्यासाठी असमर्थ, तरीही त्यांचे लसीकरण पूर्ण, महाराष्ट्राची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

महाराष्ट्र कोरोनाचा नाश करण्यात भारतातील सर्वात महत्त्वाचा राज्य ठरत आहे.

कोरोनाकाळात महाराष्ट्र राज्य हा कोरोनाने असणारा सर्वाधिक बाधित राज्य होता. पण हाच महाराष्ट्र कोरोनाचा नाश करण्यात भारतातील सर्वात महत्त्वाचा राज्य ठरत आहे. (Mumbai Corona Update: Unable to get vaccinated, yet complete vaccination, Maharashtra’s record breaking performance)

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) जुलै महिन्यापासून अश्या लोकांचे लसीकरण सुरू केले जे चालण्यामध्ये असमर्थ आहेत आणि खाटेवर पडून आहेत. अश्या लोकांसाठी घरोघरी जाऊन लसीकरणाची मोहीम राबवण्यात आली.

जुलैपासून अशा एकूण 8,672 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 17 नोव्हेंबरपर्यंत सुमारे 3,918 जणांचे संपूर्ण लसीकरण करण्यात आले आहे.

अहवालानुसार, चालण्या-फिरण्यामध्ये असमर्थ असणाऱ्या सुमारे 45% नागरिकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. तर 54% लोकांनी COVID-19 लसीचा पहिला डोस घेतला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून, नागरी संस्थेने लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचू न शकलेल्यांसाठी घरोघरी लसीकरण मोहीम राबवली.

याबाबत माहिती देताना बीएमसीचे अतिरिक्त महापालिका आयुक्त आणि सार्वजनिक आरोग्य प्रभारी सुरेश काकाणी म्हणाले की, सुरुवातीला 4,500 रुग्णांनी या मोहिमेसाठी नावनोंदणी केली होती. त्यानंतर वॉर्ड स्तरावर मागणीनुसार डोस देण्यात आला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, बीएमसीने यासाठी कोणतेही लक्ष्य निश्चित केलेले नाही कारण ही सेवा मागणीवर आधारित आहे. वृद्धापकाळामुळे आणि अनेक गंभीर आजारांमुळे अनेकांनी घरी लसीकरण करणे पसंत केले.

डी वॉर्डचे सहाय्यक महापालिका आयुक्त प्रशांत गायकवाड म्हणाले की, या मोहिमेच्या व्यवस्थापनात वॉर रूमचीही महत्त्वाची भूमिका आहे.

विशेष म्हणजे मुंबईने कोरोनाव्हायरस लसीचा पहिला डोस देण्याचे आपले निर्धारित लक्ष्य आधीच गाठले आहे.

शुक्रवारपर्यंत आर्थर रोड कारागृह आणि भायखळा कारागृहातील कैद्यांचे संपूर्ण लसीकरण करण्यात आले होते. दरम्यान, बुधवार, 17 नोव्हेंबर रोजी, राज्याने लसीचा पहिला डोस देऊन 7 कोटी नागरिकांना लसीकरण करण्याचा टप्पा गाठला, ज्यामुळे भारतामध्ये लसीचा पहिला डोस वितरित करणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र हे दुसरे राज्य बनले.

 

हे हि वाचा :

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments