आपलं शहरलोकल

Mumbai local : मुंबई लोकलचा होणार विस्तार, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची मोठी घोषणा…

मुंबई उपनगरात आता आणखी स्वयंचलित जिने लागणार आहेत

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी 14 नोव्हेंबर रोजी मुंबईला भेट दिली. त्यांनी शहराची उपनगरीय प्रणाली ( Mumbai Local Train ) आणखी वाढवण्याच्या योजनांना मंजुरी दिली आहे. त्यांनी वापी आणि नंतर वांद्रे टर्मिनसला भेट दिली, जिथे त्यांनी रेल्वे प्रवासी संघटना व भाजप कार्यकर्त्यांची भेट घेतली. (Mumbai local: Expansion of Mumbai local, big announcement of Union Railway Minister)

मुंबई उपनगरात आता आणखी स्वयंचलित जिने लागणार आहेत . उपनगरीय विभागातील छोट्या पण गर्दीच्या स्थानकांवर एस्केलेटर बसवण्याची शक्यता आहे का, अशी विचारणा वैष्णव यांनी अधिकाऱ्यांना केली आहे.

मुंबई महानगर प्रदेशात (MMR) अतिरिक्त 40 एस्केलेटर आणि 40 लिफ्ट बसवण्यासाठी मध्य रेल्वे (CR) आणि पश्चिम रेल्वे (WR) द्वारे मार्च 2022 ची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस, सीएसएमटी, जीटीबी नगर, डोंबिवली आणि उल्हासनगर ही स्थानके आहेत जिथे एस्केलेटर बसवण्यात येणार आहेत.

तसेच भायखळा, मुलुंड, कुर्ला, ठाकुर्ली, कल्याण आणि टिटवाळा स्थानकांवर लिफ्ट बसवण्याचे आदेश आले आहेत. मार्च 2022 पर्यंत, वेस्टर्न लाईनवर 20 नवीन एस्केलेटर बसवले जातील.

मध्य रेल्वेवर (CR) सध्या 84 एस्केलेटर आणि 44 लिफ्ट आहेत. पश्चिम रेल्वेवर (WR) 71 एस्केलेटर आणि 34 लिफ्ट आहेत. ग्रँट रोड, वसई आणि वापी स्थानकांजवळ लॉजिस्टिक पार्क आणि डेपो उभारण्याच्या शक्यतेवरही रेल्वेचे लक्ष आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी, पश्चिम रेल्वेने एसी लोकलची संख्या वाढवून सिंगल- जर्नी तिकिटांच्या भाड्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

 

हे हि वाचा :

 

 

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments