आपलं शहरलोकल

Mumbai Local News : आता लोकलच्या तिकिटांची चिंता मिटली, रेल्वेने उचललं महत्वाचं पाऊल

आता लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे तिकीट काढणे सोपे होणार आहे.

Mumbai Local News : मुंबई रेल्वे प्रवाशांसाठी एक चांगली बातमी. आता लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे तिकीट काढणे सोपे होणार आहे.  कारण rakway ने UTS मोबाईल App व युनिव्हर्सल पासला लिंक केले आहे.(Now the worries of local tickets are gone, Railways has taken an important step)

मध्य रेल्वेचेचे महाव्यवस्थापक, श्री अनिल कुमार लाहोटी  यांनी सांगितले की, UTS मोबाईल App व युनिव्हर्सल पास लिंक केल्याने प्रवाशांना कोणत्याही अडचणीशिवाय त्यांचे तिकीट मिळणार आहे. ज्या व्यक्तीने लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत आणि दुसरा डोस घेतल्यापासून 14 दिवस पूर्ण झाले आहेत व ट्रेनने ज्याला प्रवास करण्याची इच्छा आहे. त्यांना आता राज्य सरकारचा युनिव्हर्सल पास घ्यावा लागेल.

हे पास राज्य सरकारच्या पोर्टलवर लसीच्या स्थितीची योग्य पडताळणीनंतर जारी केले आहेत. तिकीट खरेदी करण्यासाठी प्रवाशांना तिकीट काउंटरवर युनिव्हर्सल पास दाखवावा लागेल.  आता युनिव्हर्सल पास जारी करण्यासाठी राज्य सरकारचे पोर्टल रेल्वे UTS मोबाइल App सह एकत्रित केले गेले आहे, ज्यामध्ये उपरोक्त श्रेणीतील प्रवासी काउंटरवर न जाता तिकीट खरेदी करू शकतात.

या app द्वारे प्रवास व सीझन तिकीट दोन्ही जारी केले जाऊ शकतात.  सीझन तिकिटांचे नूतनीकरण देखील शक्य आहे.  प्रवाशांना तिकीट घेण्यासाठी काउंटरवर जाण्याची गरज नाही.   तसेच ही सुविधा 24.11.2021पासून Android Google Play Store आणि Apple App Store वर उपलब्ध होणार आहे. ज्या प्रवाशांनी आधीच UTS मोबाइल App डाउनलोड केले आहे त्यांना ही नवीन उपयुक्तता सक्रिय करण्यासाठी App अपडेट करणे आवश्यक आहे.

कोरोना साथीच्या काळात, प्रवाशांच्या लसीकरण स्थितीची पडताळणी करणारी कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे UTS मोबाइल app निलंबित करण्यात आले होते.  मात्र आता UTS aap राज्य सरकारचे पोर्टल आणि रेल्वे UTS  मोबाइल aap ला जोडून योग्य लसीकरण पडताळणीसह लोकांसाठी लॉन्च केले जाणार आहे.

हे नवीन  Application एक स्वतंत्र उदाहरण आहे जिथे रेल्वे सर्व्हर तिकिटांच्या पडताळणीसाठी बाह्य सर्व्हरशी हात जोडत आहे.  युनिव्हर्सल पास पोर्टल व UTS मोबाईल App ला जोडण्याचा प्रयत्न महाराष्ट्र राज्य सरकार, CRIS आणि मध्य रेल्वे यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आला आहे.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments