आपलं शहरलोकल

Mumbai local : सेंट्रल रेल्वेवर भारतातील पाहिले पॉड हॉटेलची सुविधा, पहा काय आहे व्यवस्था…

भारतीय रेल्वेने मुंबई सेंट्रल स्थानकावर पॉड हॉटेल सुरू केले आहे.

Mumbai local : भारतीय रेल्वे एक जगप्रसिद्ध वाहतुकसेवा आहे तसेच ही वाहतूक सेवा दिवसेंदिवस आधुनिक होत आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांना एक अप्रतिम भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.(Pod Hotel facility seen in India on Central Railway, see what is the arrangement …)

परदेशाप्रमाणेच, लवकरच प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर पॉड कॉन्सेप्ट रिटायरिंग रूममध्ये आराम करता येणार आहे. भारतीय रेल्वेने मुंबई सेंट्रल स्थानकावर पॉड हॉटेल सुरू केले आहे. मुंबईनंतर, IRCTC आग्रा, जयपूर, कटरा, जम्मू, दिल्ली स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी या संकल्पनेवर रिटायरिंग रूम बांधण्याचा विचार करत आहे. यासाठी उत्तर रेल्वेकडून मंजुरीही मागवण्यात आली आहे. स्थानकांवर जागा उपलब्ध करून देण्याचा हिरवा सिग्नल मिळताच पॉड्स बांधणे शक्य होणार आहे.

पॉड हॉटेल्समध्ये एका व्यक्तीला झोपण्यासाठी कॅप्सूलसारख्या अगदी लहान खोल्या असतात, ज्यात सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असतात. हे इतर रिटायरिंग रूमच्या तुलनेत खूप स्वस्त असतात. भारतीय रेल्वेचे प्रवासी आणि अगदी सामान्य लोकही आता स्वस्त दरात आधुनिक आराम सुविधांचा लाभ घेऊ शकतात.

पॉड डिझाइनची ही रिटायरिंग रूम अशा प्रकाराची भारतीय रेल्वेची पहिली रिटायरिंग रूम आहे. रेल्वेच्या इतिहासात प्रथमच, प्रवाशांना आता मुंबई सेंट्रलवर आगमन झाल्यावर पूर्णपणे नवीन बोर्डिंग सुविधेचा अनुभव मिळणार आहे. IRCTC ने खुल्या निविदा प्रक्रियेद्वारे नऊ वर्षांसाठी पॉड कॉन्सेप्ट रिटायरिंग रूम्सची स्थापना करून चालवणे आणि व्यवस्थापन करण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. ते तीन वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकते.

पश्चिम रेल्वे (WR) च्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या पॉड हॉटेलमध्ये राहण्यासाठी 12 तासांसाठी 999 रुपये आणि 24 तासांसाठी 1,999 रुपये मोजावे लागतील. वायफाय, टीव्ही, एक छोटा लॉकर, आरसा आणि रीडिंग लाईट , इंटिरियर लाईट, मोबाइल चार्जिंग, स्मोक डिटेक्टर, डीएनडी इंडिकेटर इत्यादी सुविधा येथे पुरविल्या जातील. पॉड हॉटेलमध्ये अनेक लहान बेड कॅप्सूल आहेत आणि प्रवाशांना रात्रभर राहण्याची सोय उपलब्ध आहे.

भारतीय रेल्वेच्या पहिल्या पॉड हॉटेलचे बुधवारी दक्षिण मुंबईतील चर्चगेट स्थानकावरून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. मंत्री महोदयांनी व्हिडीओ लिंकद्वारे विविध प्रवासी सुविधांचे उद्घाटनही केले. या कार्यक्रमात बोलताना दानवे म्हणाले की, पॉड-कॉन्सेप्ट हॉटेल्समध्ये प्रवाशांना परवडणाऱ्या दरात राहण्याची सुविधा मिळेल. पॉड हॉटेलला कॅप्सूल हॉटेल म्हणूनही ओळखले जाते.

रेल्वे स्थानकाच्या पहिल्या मजल्यावर बांधलेले संपूर्ण पॉड हॉटेल तीन हजार चौरस फुटांवर पसरले आहे. यामध्ये 48 कॅप्सूल सारख्या खोल्या आहेत ज्यात क्लासिक पॉड्स, प्रायव्हेट पॉड्स, महिलांसाठी आणि दिव्यांगांसाठीच्या पॉड्स आहेत. क्लासिक पॉड्सची संख्या 30 आहे तर महिलांसाठी अशा सात पॉड्स आहेत. याशिवाय 10 खाजगी पॉड्स आणि दिव्यांगांसाठी एक पॉडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments