आपलं शहरलोकल

Mumbai local : रेल्वेमध्ये लागणार टीव्ही, पहा काय असेल त्यांचा उपयोग

मुंबईतील पश्चिम रेल्वेने मुंबई लोकल ट्रेनमध्ये टीव्ही स्क्रीन बसवण्याचा निर्णय रविवार, 31 ऑक्टोबर रोजी घेतला आहे. 

Mumbai local : मुंबईतील पश्चिम रेल्वेने मुंबई लोकल ट्रेनमध्ये टीव्ही स्क्रीन बसवण्याचा निर्णय रविवार, 31 ऑक्टोबर रोजी घेतला आहे.  रेल्वेने आतापर्यंत आठ लोकल ट्रेनच्या डब्यांमध्ये इन्फोटेनमेंट स्क्रीन बसवल्या आहेत. हा प्रकल्प नॉन-फेअर महसूल योजनेचा भाग आहे. पुढील काळात या LCD स्क्रीनवरून एकूण 20 EMU रेक बसवले जाणार आहेत.(TV will be needed in the train, see what their use will be)

या टीव्ही स्क्रीनवर रेल्वेने जारी केलेल्या व्यावसायिक जाहिराती व जनहिताची माहिती प्रदर्शित केली करण्यात येणार आहे.  यामुळे रेल्वेच्या विकास महसुलात वाढ होण्याची अपेक्षा आहे.

हा उपक्रम नॉन-फेअर रेव्हेन्यू मॉडेल अंतर्गत घेण्यात आला आहे. रेल्वेला करारानुसार वार्षिक 65 लाख रुपये व पाच वर्षांच्या कालावधीसाठी सुमारे 3.45 कोटी रुपये मिळणार आहेत. या प्रकल्पाला प्रवाशांचा सकारात्मक व उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. असे पश्चिम रेल्वेचे हेड PRO सुमित ठाकूर यांनी सांगितले.

लोकल ट्रेनच्या डब्यात बसवलेले  LCD टीव्ही स्क्रीन हे इन्फोटेनमेंट उपकरणे आहेत. ज्यात जागरूकता उपक्रम, सार्वजनिक आणि रेल्वेशी संबंधित माहितीसह व्यावसायिक जाहिराती प्रदर्शित केल्या जात आहेत.

याआधी, मध्य रेल्वेने इन्फोटेनमेंट हॉटस्पॉट उपकरणे बसवण्याची योजना देखील आखली होती. ज्यामुळे प्रवाशांना लोकल ट्रेनच्या डब्यांमध्ये चित्रपट, सोप ऑपेरा, ऑडिओ-व्हिडिओ गाणी देखील पाहता येत आहेत.  प्रवाशांना मोबाईल ऍप्लिकेशनच्या मदतीने कोचमध्ये चित्रपट, सोप ऑपेरा स्ट्रीम करता येणार आहे.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments