आपलं शहर

Mumbai Pollution : फटाक्यांचा गोंधळ झाला कमी, मात्र प्रदूषणाने उच्चांक गाठला

परंतु मुंबईत यंदा दिवाळीत फटाक्यांचा आवाज कमी असला, तरी प्रदूषणाची पातळी मात्र थोडी वाढली आहे. 

Mumbai Pollution : यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत दिवाळी सण हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. परंतु मुंबईत यंदा दिवाळीत फटाक्यांचा आवाज कमी असला, तरी प्रदूषणाची पातळी मात्र थोडी वाढली आहे.  मुंबईत लक्ष्मीपूजनाच्या एका दिवसानंतर, म्हणजेच शुक्रवारी हवेची गुणवत्ता 221 AQI नोंदवण्यात आली, जी खराब श्रेणीत मोडते, तर दादरच्या सायलेन्स झोनमध्ये फटाक्यांचा आवाज गेल्या वर्षीच्या तुलनेत 5 डेसिबलपेक्षा कमी नोंदवण्यात आला आहे.(The number of firecrackers has decreased, but the pollution has reached its peak)

दिवाळीपूर्वी मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावू लागली होती, परंतु लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरातील हवेची गुणवत्ता सरासरी 162 AQI नोंदवली गेली.  हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणाऱ्या ‘सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च’ने मुंबईतील हवेची गुणवत्ता दर दिवाळीत नोंदवल्या जाणाऱ्या ‘अतिशय खराब’ श्रेणीत राहण्याचा अंदाज वर्तवला असला, तरी त्यामानाने मुंबईतील हवेची गुणवत्ता दर्जेदार ठरली. तसेच  शनिवारी हवेच्या गुणवत्तेत आणखी सुधारणा झाल्याचे दिसून आले,  शहरातील हवेची सरासरी गुणवत्ता 97 AQI नोंदवली गेली जी हवेची गुणवत्ता चांगली असल्याचे दर्शवते.

आवाज या ध्वनिप्रदूषणाविरोधात काम करणाऱ्या संस्थेने वांद्रे, माहीम, वरळी, दादर, शिवाजी पार्क, बाबुलनाथ, मरीन ड्राईव्हमध्ये गेल्या वर्षीपेक्षा कमी फटाक्यांचा आवाज नोंदवला आहे.  दादरच्या सायलेन्स झोनमध्ये गेल्या वर्षी 105.5 डेसिबल ध्वनिप्रदूषणाची नोंद झाली होती, तर यंदा 100 डेसिबलची नोंद झाली आहे.

हवेची गुणवत्ता (शनिवार)

मालाड – 204 AQI, कुलाबा – 162 AQI, चेंबूर – 86 AQI, अंधेरी – 114 AQI, BKC – 169 AQI, बोरिवली – 113 AQI, माझगाव – 101 AQI, वरळी – 153 AQI,  भांडुप – 50 AQI शनिवारी याप्रमाणे मुंबईतील विविध भागांमध्ये हवेची गुणवत्ता नोंदवण्यात आली.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments