खूप काहीहेल्थ

Mumbai Update : मुंबईत कोरोना शांत,परंतु मलेरिया, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या आजारांमध्ये वाढ…

गेल्या आठवडाभरात मुंबईत मलेरिया, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे.

Mumbai Update : मुंबईत राहणारे नागरिक हे गेल्या काही महिन्यांपासून अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. मुंबईत कोरोना नियंत्रणात असला तरी इतर आजारांचा आलेख मात्र वाढताना दिसत आहे. गेल्या आठवडाभरात मुंबईत मलेरिया, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. मुंबईमध्ये  7 ते 14 नोव्हेंबर दरम्यान मलेरियाचे 80, डेंग्यूचे 23, गॅस्ट्रोचे 72, चिकुनगुनियाचे 7 व लेप्टोचे 4 रुग्ण आढळून आले आहेत.(Corona calm in Mumbai, but increase in malaria, dengue and gastroenteritis …)

गेल्या 19 महिन्यांपासून मुंबईकर कोरोनाविरुद्ध लढा देत आहेत.  मुंबईकरांच्या मदतीमुळे व योग्य उपचारांमुळे मुंबईत व तसेच इतर भागात कोरोनाची पहिली व दुसरी लाटही शांत झाली आहे, पण मान्सूनशी संबंधित साथीच्या आजारांचा उद्रेक आजही कायम आहे.

7 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर पर्यंतचा डेटा

मलेरिया – 152 रुग्ण, डेंग्यू – 70 रुग्ण, गॅस्ट्रो – 121 रुग्ण, कावीळ – 13 रुग्ण, चिकुनगुनिया – 9 रुग्ण, लेप्टो – 4 रुग्ण ,तर या कालावधीत स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण आढळला नाही.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments